PPF Investment Calculator : जोखीममुक्त आणि सरकारची हमी असलेली पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानली जाते. दरवर्षी फक्त ₹1 लाख गुंतवले, तरी केवळ 15 वर्षांत तुम्हाला 27 लाखांहून अधिक रक्कम मिळू शकते. सध्या या योजनेवर सरकारकडून 7.1% चक्रवाढ व्याजदर दिला जातो.
PPF म्हणजे काय? किती रक्कम गुंतवता येते?
PPF ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली चालणारी दीर्घकालीन बचत योजना आहे. यात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान ₹500 आणि कमाल ₹1.5 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूक एकरकमी किंवा हप्त्यांमध्येही करता येते.
15 वर्षांनंतर मिळणारी रक्कम
जर एखाद्या व्यक्तीने दरवर्षी ₹1 लाख गुंतवले, तर 15 वर्षांच्या अखेरीस त्याला मिळणारी एकूण रक्कम असेल ₹27,12,139. यात मूळ गुंतवणूक ₹15 लाख आणि त्यावर मिळालेल व्याज ₹12,12,139 इतक आहे. हे सर्व गणित सध्याच्या 7.1% चक्रवाढ व्याजदरावर आधारित आहे.
इतर फायदे आणि अटी
कोणताही भारतीय नागरिक आपल PPF खात बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतो.
अल्पवयीन मुलांच्या नावाने सुद्धा खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मात्र, एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकच PPF खाते उघडता येऊ शकते.
या योजनेतील गुंतवणुकीवर (80C अंतर्गत) करसवलत मिळते आणि मिळणारे व्याजदेखील करमुक्त असते.
हेही वाचा : मध्यवर्गीयांसाठी खुशखबर? RBI 6 जूनला घेणार मोठा निर्णय; कर्जाचे हप्ते होणार कमी?.