Property Rights Of Wife After Husband Death : पतीच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीत पत्नीचा किती हिस्सा असतो, हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो. आपल्या देशात दीर्घकाळ पितृसत्ताक समाजव्यवस्थेचे वर्चस्व राहिल्याने, महिलांना संपत्तीवरील हक्कांविषयी पुरेशा संधी आणि माहितीचा अभाव दिसून येतो. मात्र स्वातंत्र्यानंतर महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतात अनेक कायदेशीर सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामधून त्यांना मालमत्तेतील अधिकार प्राप्त झाले आहेत.
हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी ही पतीच्या संपत्तीची कायदेशीर वारसदार असते. पती जर मृत्युपत्र न ठेवता मरण पावला असेल, तर त्याची संपत्ती त्याच्या वारसांमध्ये विभागली जाते आणि या वारसांमध्ये पत्नीचा समावेश असतो. अशा परिस्थितीत पत्नी, मुले आणि आई-वडील यांच्यात मालमत्ता समान हिश्यात विभागली जाते.
पण जर पतीने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र तयार केल असेल आणि त्यामध्ये विशिष्ट नाव नमूद केल असेल, तर मालमत्ता त्या व्यक्तीच्या नावे केली जाईल. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पत्नीचा हक्क मृत्युपत्रा प्रमाणे मर्यादित असू शकतो. याशिवाय, पतीच्या आईवडिलांची मालमत्ता त्यांच्या मृत्यूनंतर थेट सूनांच्या नावे करता येत नाही. त्या संपत्तीचा हक्क फक्त त्या व्यक्तीच्या मुलांनाच असतो. परंतु जर सासू-सासऱ्यांनी मृत्युपत्र न करताच त्यांचा मृत्यू झाला, आणि त्यांचा मुलगाही हयात नसला, तर त्या संपत्तीवर सूनेचा हक्क असतो.
हिंदू विधवा महिला जर स्वतःच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर उपजीविका चालवू शकत नसेल, तर तिला पतीच्या वडिलांकडून भरण-पोषणाचा दावा करण्याचा अधिकार असतो, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विधवा महिलांना कायदेशीर संरक्षण मिळते.
🔴 हेही वाचा 👉 दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; शासकीय नोकरीसाठी तात्काळ नोंदणी करा.