रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना: ३० जूनपूर्वी पूर्ण करा हे काम, अन्यथा मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ Ration Card Ekyc Deadline

2 Min Read
Ration Card Ekyc Deadline June 2025 Update

Ration Card Ekyc Deadline June 2025 Update : मोफत रेशन आणि शासकीय योजनांचा लाभ सतत्याबे घेत राहायच असेल, तर रेशनकार्डधारकांनी येत्या ३० जून २०२५ पर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर तुमच रेशनकार्ड रद्द होऊ शकत आणि तुम्हाला मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) देशभरातील सर्व लाभार्थ्यांसाठी e-KYC अनिवार्य करण्यात आल आहे. सरकारने ही प्रक्रिया वेगाने सुरू केली असून, सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांसाठीही e-KYC आवश्यक आहे.

e-KYC कशी करावी?

e-KYC करण्यासाठी तुम्ही दोन पर्याय निवडू शकता:

  1. रेशन डीलरमार्फत: आपल्या जवळच्या रेशन वितरकाकडे जाऊन, बायोमेट्रिक मशीनवर अंगठा (fingerprint) देऊन KYC करता येते. रेशनकार्डवर ज्या सदस्यांची नावे आहेत, त्यां सर्व सदस्यांची KYC करणे आवश्यक आहे.
  2. ऑनलाईन किंवा मोबाईल अ‍ॅपने: वेबसाईट: nfsa.gov.in वर जाऊन e-KYC करता येते.
    मोबाईल अ‍ॅप: ‘मेरा KYC’ आणि ‘AadhaarFaceRD’ अ‍ॅप डाउनलोड करून फेस ई-केवायसीद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते.

आवश्यक कागदपत्रांची यादी:

आधार कार्ड (सर्व युनिटसाठी)
रेशन कार्ड
आधार लिंक असलेला मोबाइल नंबर
बँक पासबुकाची झेरॉक्स
पासपोर्ट साइज फोटो
पत्त्याचा पुरावा
अंगठ्याचा डिजिटल स्कॅन

e-KYC साठी पैसे लागतात का?

e-KYC सेवा पूर्णपणे मोफत आहे. जर तुमच्याकडे यासाठी रेशन डीलरने पैसे मागितल्यास तुम्ही संबंधित विभागाकडे त्याची तक्रार नोंदवू शकता.

Ration Card e-KYC ची शेवटची संधी

पूर्वी ही अंतिम तारीख ३१ मार्च होती, नंतर ती ३० एप्रिल करण्यात आली. आता सरकारने ही ३० जून २०२५ पर्यंत वाढवली आहे. मात्र त्यानंतर कोणती वाढ करण्यात येईल याची खात्री नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कारणे आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार.

Share This Article