RBI 20 Rupees Note : 20 रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय! 20 रुपयांची नोट बदलणार!

2 Min Read
RBI 20 Rupees Note New Update

RBI 20 Rupees Note New Update 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹20 च्या नोटांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच बाजारात २० रुपयांच्या नोटांची नवीन मालिका येणार असून, यामध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, जुन्या नोटा या निर्णयामुळे अवैध ठरणार नाहीत.

दिसायला कशी असेल २० रुपयांची नवी नोट आणि तिची वैशिष्ट्य

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन ₹20 च्या नोटांवर आरबीआयचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटांचा आकार आणि रंग (हिरवट-पिवळा) पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आला असून, डिझाइनमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत.

२० रुपयांच्या नव्या नोटांवर एलोरा लेण्यांचे सुंदर चित्र देखील असणार आहे, जे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. याआधीच्या नोटांवर सूर्य मंदिराची छायाचित्रे होती, ती आता बदलली जाणार आहेत.

जुन्या नोटांच काय होणार?

सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे, 20 रुपयांच्या जुन्या नोटा पूर्णपणे वैधच राहतील. RBI ने स्पष्ट सांगितले आहे की जुन्या नोटा बाजारातून काढून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी कोणतीही घाई किंवा गडबड करण्याची गरज नाही.

निष्कर्ष

RBI चा हा निर्णय एकीकडे चलन व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असला, तरी सर्वसामान्यांसाठी काहीही अडचणीचा नाही. नवीन नोटा हळूहळू चलनात येतील आणि जुन्यांसोबतच वापरात राहतील.

🔴 हेही वाचा 👉 “शेतकऱ्यांकडून CIBIL मागू नका” – फडणवीसांचा बँकांना इशारा; कारवाईचाही इशारा.

Share This Article