RBI New KYC Rules Bank Account Reopen 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशभरातील बँक ग्राहकांसाठी केवायसी (KYC) प्रक्रिया आणखी सुलभ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेषतः ज्या खात्यांमध्ये दीर्घकाळ व्यवहार नाहीत किंवा ज्या खात्यांमध्ये असलेली ठेव रक्कम अजूनही दावा न केल्यामुळे अडकून पडली आहे, अशा खत्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आता ग्राहकांना फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
व्हिडिओ केवायसीने शक्य होणार खाते पुन्हा सुरु करणे
नव्या निर्देशांनुसार, ग्राहक आता आपल बंद झालेल खात पुन्हा सुरू करण्यासाठी व्हिडिओ KYC चा वापर करू शकतात. यासाठी संबंधित बँकेच्या मूळ (होम) शाखेत प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. केवायसी अपडेट ही प्रक्रिया देशातील कोणत्याही शाखेतून करता येणार आहे.
केवायसी पूर्ण नसतानाही व्यवहार शक्य
आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत की, “कमी जोखमीच्या” ग्राहकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण नसली, तरी व्यवहार करण्याची परवानगी द्यावी. केवायसी अपडेटसाठी अशा ग्राहकांना 30 जून 2026 पर्यंतचा कालावधी दिला गेला आहे.
स्थानिक प्रतिनिधीद्वारेही होणार केवायसी अपडेट
बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या बँकिंग कॉरेस्पोंडंट (BC) — म्हणजेच बँकेकडून अधिकृत प्रतिनिधी म्हणून नेमले गेलेले घटक, जसे स्वयं-सहायता गट, NGO, मायक्रो फायनान्स संस्था किंवा स्थानिक किराणा दुकानदार — यांनाही आता केवायसी प्रक्रिया करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि मोबिलिटीमध्ये अडचण असलेल्या नागरिकांनाही केवायसीसाठीचा त्रास सहन करावा लागणार नाही.
बँकांना सूचना देणे बंधनकारक
ग्राहकांचा वेळेवर केवायसी अपडेट करावी यासाठी बँकांनी निदान एक पत्र पाठवणे आणि तीन वेळा आधी सूचना देणे आवश्यक असेल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
RBI च्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा : Android यूजर्सना मोठा अलर्ट: ‘हे’ धोकादायक अॅप्स तातडीने डिलीट करा, बँक डिटेल्स लीक होण्याचा धोका.