नवी दिल्ली | 1 जून 2025 : RBI Note News — आपल्या खिशात असलेल्या काही नोटा आता पुन्हा छापल्या जाणार नाहीत! भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच सादर केलेल्या वार्षिक अहवालात चलन रचनेबाबत काही मोठे निर्णय घेतले आहेत, जे थेट आपल्या रोजच्या व्यवहारांवर आणि डिजिटल पेमेंटच्या भविष्यावर परिणाम करू शकतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केल आहे की आता 2 रुपये, 5 रुपये आणि 2000 रुपयांच्या नोटांची छपाई पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की या मूल्यवर्गांच्या नवीन नोटा भविष्यात चलनात दिसणार नाहीत. मात्र, या नोटा सध्या वैध असल्यामुळे तुम्ही त्यांचा वापर करू शकता, पण बाजारातून त्या हळूहळू गायब होणार आहेत.
2000 रुपयांच्या नोटा जवळपास गायब
2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. RBI च्या म्हणण्यानुसार, मार्च 2025 पर्यंत 98.2% नोटा बँकिंग सिस्टीममध्ये परत आल्या असून, या नोटांची छपाई पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आता या नोटा बाजारातून जवळपास नाहीशा झाल्या आहेत.
500 रुपयांची नोट ठरली सर्वाधिक वापरली जाणारी नोट
सध्या 500 रुपयांची नोट सर्वाधिक वापरली जाणारी नोट ठरली असून, ती एकटीच संपूर्ण नोटांच्या संख्येच्या 40.9% आणि चलन मूल्याच्या 86% हिस्सा व्यापते. त्यामुळे बाजारात रोख व्यवहार करताना या नोटेची प्रमुख भूमिका असल्याच स्पष्ट होत.
डिजिटल रुपयाचा वेगाने विस्तार
डिजिटल चलन (e₹) च्या बाबतीतही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. 2025 मध्ये e₹ चा वापर आणि मूल्य 334% ने वाढून 1016.5 कोटी रुपये इतक झाल आहे. यामुळे डिजिटल इंडिया मोहीमेला अधिक गती मिळतेय.
नाण्यांमध्येही वाढ
RBI च्या अहवालानुसार ₹1, ₹2 आणि ₹5 च्या नाण्यांचे प्रमाण सध्या सर्वाधिक असून, 81.6% चलन नाण्यांच्या स्वरूपात आहे. एकूण नाण्यांची संख्या 3.6% आणि त्यांच मूल्य 9.6% ने वाढल आहे.
बनावट नोटांबाबत काय स्थिती?
2000, 10 आणि 20 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये घट झाली आहे. मात्र, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
चलन रचना अधिक सुलभ आणि डिजिटलकडे झुकणारी
RBI च्या या निर्णयांमुळे भारताची चलन रचना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणारी होत असल्याच स्पष्टपणे दिसत आहे. देशात रोखीच्या व्यवहारांच प्रमाण घटत चालल असून डिजिटल पेमेंट्सचा वापर वाढत आहे.
हेही वाचा : कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय? रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; सरकारचा जनतेला सावधगिरीचा इशारा.