RBI Star Marked Notes Legal Or Fake : सामान्यतः भारतीय चलनातील नोटांवर सीरियल नंबर असतो, मात्र अनेकदा नागरिकांच्या हातात अशी एखादी नोट येते, जिच्या सीरियल नंबरमध्ये एक छोटा ‘*’ ‘स्टार’ असतो. अशावेळी अनेक जण संभ्रमात पडतात की ही नोट खरी आहे की नकली. काहींना वाटते की याची काही वेगळी किंमत असावी, तर काहींना ही नोट बनावट वाटते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
RBI Star Note Clarification : आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, सीरियल नंबरमध्ये स्टार असलेल्या नोटा बनावट नसतात तर त्या एक ‘रिप्लेसमेंट नोट’ असतात. नोट छपाईदरम्यान जर एखादी नोट खराब निघाली, तर त्याच्या जागी जी नवीन नोट छापली जाते, त्यावर स्टारच चिन्ह लावल जात. यामागचा उद्देश असा की ही नोट मूळ सिरीजमधील बदललेली नोट आहे, हे स्पष्टपणे ओळखता याव.
‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटांबाबत घाबरण्याचे काहीच कारण नाही. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की अशा प्रकारच्या सर्व स्टार असलेल्या नोटा पूर्णतः कायदेशीर आणि वैध (Legal Tender) आहेत. त्यांचा वापर सामान्य नोटांप्रमाणेच कुठेही आणि कधीही करता येतो. या नोटांची किंमत देखील इतर नोटांप्रमाणेच असते, त्यात कोणताही फरक नाही.
RBI ने प्रथम 2006 साली अशा प्रकारच्या स्टार असलेल्या नोटा चलनात आणल्या होत्या. नोटांच्या बंडल मध्ये 100 नोट्स असतात, त्यातील एखादी नोट खराब असल्यास त्याच्या ऐवजी स्टार असलेली नोट बंडलमध्ये टाकली जाते. या रिप्लेसमेंट नोट्समध्ये फक्त स्टार चिन्ह वेगळ असत, इतर सर्व बाबी (डिझाइन, सुरक्षा वैशिष्ट्ये, मूल्य) हे इतर नोटांप्रमाणेच असते.
या प्रणालीचा वापर खूप मर्यादित प्रमाणात होतो. अंदाजे दर 1000 नोटांमध्ये 100 नोटा अशा प्रकारे रिप्लेसमेंट केलेल्या (स्टार चिन्हित) असू शकतात. त्यामुळे या नोटा मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाहीत.
अशा परिस्थितीत जर तुमच्या हातात कधी स्टार असलेली नोट आली, तर घाबरू नका. ती बनावट नोट नाही, ना तीच बाजारमूल्य वेगळ आहे. ती फक्त खराब नोटेच्या जागी आलेली एक अधिकृत बदललेली नोट आहे, जी वापरण्यास पूर्णपणे वैध आहे.
हेही वाचा : एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 12000 रुपये आजीवन पेन्शन; सर्व वयोगटासाठी नागरिकांसाठी.