Saving VS Current Account Difference : आजच्या काळात बँकिंग हे आपल्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. बचत करणे, गरजेसाठी निधी राखून ठेवणे, आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बँक खात अत्यंत आवश्यक असत. पण आपण जेव्हा बँकेत खात उघडण्यासाठी जातो, तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो – “बचत खाते हवे आहे की चालू खाते?” अनेकांना हे दोन्ही खात्याचे प्रकार नेमके काय आहेत ते माहित नसते आणि त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेणे कठीण जाते.
बचत खाते म्हणजे काय?
सेव्हिंग अकाउंट, ज्याला आपण ‘बचत खाते’ म्हणतो, हे सामान्य नागरिकांसाठी बनवलेले केलेले खाते असते. या खात्यातून बँक आपल्या ठेवलेल्या पैशांवर व्याज देते. या खात्याचा उद्देश लोकांना बचतीसाठी प्रोत्साहन देणे आहे. यामध्ये आपण सिंगल किंवा जॉइंट खाते उघडू शकतो. जरी यामध्ये व्यवहारांची मर्यादा असली तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे खाते सामान्य नागरिकांसाठी योग्य आहे. वरिष्ठ नागरिकांना यामध्ये विशेषतः अधिक व्याज दराचा लाभ मिळतो.
चालू खाते म्हणजे काय?
करंट अकाउंट म्हणजेच चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. या खात्यात व्यवहारांची मर्यादा नसते – म्हणजेच यामध्ये आपण कितीही व्यवहार करू शकतो. मात्र, या खात्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. त्यामुळे फक्त व्यवसाय, संस्थात्मक किंवा व्यावसायिक व्यवहारांसाठी हे खाते उपयुक्त मानले जाते.
कोणते खाते निवडावे?
जर आपण सामान्य नोकरदार किंवा वैयक्तिक खर्चासाठी खाते उघडणार असाल, तर सेव्हिंग अकाउंट योग्य आहे. परंतु जर आपल्या व्यवहारांची संख्या मोठी असेल, आणि व्यवसायाशी संबंधित व्यवहार नियमित होणार असतील, तर करंट अकाउंट अधिक योग्य ठरते.
आजही अनेकांना हे दोन खाते प्रकार समजत नाहीत आणि त्यामुळे लोक चुकीचा निर्णय घेतात. म्हणूनच, कोणते खाते आपल्यासाठी योग्य आहे हे समजून घेऊनच निर्णय घेणे आवश्यक आहे.
🔴 हेही वाच 👉 मोदी सरकारची ‘संजीवनी’ योजना सुरू; अपघात झाल्यास 1.5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.