Sim Card New Rule : मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार विभागाने सिम कनेक्शनमध्ये बदलासंदर्भातील नियमात मोठा बदल केला आहे. यानुसार, आता प्रीपेड ते पोस्टपेड किंवा पोस्टपेड ते प्रीपेड या दोन्ही प्रकारात 30 दिवसांच्या आत एकदाच बदल शक्य झाला आहे. पूर्वी या प्रक्रियेसाठी 90 दिवसांची प्रतीक्षा आवश्यक होती.
काय आहे नवीन नियम?
जर तुम्ही एकदा प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये (किंवा उलट) स्विच केल, आणि तुम्हाला नवीन प्लॅन आवडला नाही, तर आता 30 दिवसांच्या आत पुन्हा एकदा स्विच करण शक्य आहे. मात्र, हे दुसऱ्यांदा करण्यासाठी 90 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.
ओटीपी प्रक्रिया आणि केवायसी नियम
30 किंवा 90 दिवसांपूर्वीच स्विच करायचा असल्यास, ग्राहकाला OTP प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेतून जाव लागेल. तसेच, काही प्रकरणांमध्ये फ्रेश KYC (Know Your Customer) प्रक्रिया करावी लागेल. यासाठी ग्राहकाला सीएसई सेंटर किंवा अधिकृत POS (Point of Sale) केंद्रात जाव लागेल.
ग्राहकांना काय फायदा?
पोस्टपेडमध्ये स्विच केल्यावर अनेक ग्राहकांना प्लॅन महाग वाटतात.
नवीन नियमानुसार, जर एखाद्या प्लॅनबाबत समाधान नसेल, तर 30 दिवसांच्या आत पुन्हा मूळ प्लॅनमध्ये परतता येईल.
हे नियम ग्राहकांना अधिक लवचिकता व स्वातंत्र्य देतील आणि सेवा निवडीबाबत समाधानकारक निर्णय घेता येईल.
पण पुन्हा-पुन्हा बदल शक्य नाही
हे लक्षात घ्या की, सतत प्रीपेड-पोस्टपेड बदल करण्यावर मर्यादा आहे. एकदा 30 दिवसांत बदलल्यानंतर, पुन्हा बदलासाठी 90 दिवसांची प्रतीक्षा बंधनकारक असेल. यामागचा उद्देश म्हणजे दुरुपयोग टाळणे आणि सेवा प्रदात्यांसाठी स्थिरता राखणे.
हेही वाचा : आता UPI व्यवहारासाठी लागणार नाही इंटरनेट.