स्पॅम कॉल्समुळे त्रास होतोय? हे सरकारी अ‍ॅप ठरेल उपयुक्त Trai DNS App Spam Call Blocker Official

2 Min Read
Trai DNS App Spam Call Blocker Official

Trai DNS App Spam Call Blocker Official : मोबाईल युगात सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये मोठी भर घालणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे स्पॅम कॉल्स आणि प्रमोशनल मेसेजेस. दिवसाला अनेक वेळा येणाऱ्या क्रेडिट कार्ड, लोन, मार्केटिंग ऑफर्स संबंधित कॉल्समुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सरकारी अ‍ॅपच्या माध्यमातून प्रभावी उपाय सुचवला आहे.

TRAI DND अ‍ॅप काय आहे?

TRAI DND (Do Not Disturb) अ‍ॅप हे एक मोफत आणि अधिकृत सरकारी अ‍ॅप्लिकेशन आहे, जे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसपासून संरक्षण देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. Android व iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे आणि याला PIB Fact Check टीमने अधिकृत आणि सुरक्षित असल्याची पुष्टी दिली आहे.

TRAI DND अ‍ॅपची वैशिष्ट्ये

वापरकर्त्यांना येणारे स्पॅम कॉल किंवा मेसेज थेट अ‍ॅपमधून तत्काळ रिपोर्ट करता येतात
तुम्ही केवळ इच्छित विषयांवर आधारित कॉल्स/मेसेजेस स्वीकारण्याची निवड करू शकता
संपूर्ण DND रजिस्ट्रेशनद्वारे सर्व प्रकारचे प्रमोशनल कॉल्स बंद करता येतात
केलेल्या तक्रारींचा Status Track करण्याची सुविधा
अ‍ॅपमध्ये कोणतीही जाहिरात (ads) नाहीत आणि डेटा सुरक्षिततेसाठी TRAI कडून योग्य खबरदारी

कसे वापरावे TRAI DND अ‍ॅप?

  1. Google Play Store किंवा Apple App Store वरून “TRAI DND” हे अ‍ॅप डाउनलोड करा
  2. मोबाईल नंबर OTP द्वारे वेरिफाय करा
  3. DND Preferences सेट करा – तुम्ही पूर्ण DND (सर्व कॉल्स बंद) किंवा विशिष्ट कॅटेगरी निवडून त्यावरून कॉल्स स्वीकारू शकता
  4. जर स्पॅम कॉल किंवा मेसेज आला, तर “Report Spam” बटणावर क्लिक करून लगेच तक्रार नोंदवा
  5. “Complaint Status” विभागातून तक्रारीची प्रगती तपासा

का वापराव हे अ‍ॅप?

स्पॅम कॉल्समुळे वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग, मानसिक तणाव, आणि वेळेचा अपव्यय यासारख्या समस्या होऊ शकतात. अशावेळी TRAI च्या अधिकृत DND अ‍ॅपचा वापर केल्यास वापरकर्त्यांना स्वतःच्या डिजिटल प्रायव्हसीवर अधिक नियंत्रण मिळते, आणि त्यांच्यावर होणारा अनावश्यक डिजिटल भार कमी होतो.

हेही वाचा : १०वी १२वी मध्ये ६०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत लॅपटॉप.

Share This Article