नवी दिल्ली, १६ जून २०२५: UIDAI New App Aadhaar Update Online QR Sharing – आधारशी संबंधित बदल करण्यासाठी आता नागरिकांना आधार केंद्रात जाण्याची गरज उरणार नाही. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) लवकरच एक नवीन मोबाइल अॅप सादर करणार आहे, ज्याद्वारे पत्ता, नाव, फोन नंबर, आणि जन्मतारीख यासारखे अपडेट घरबसल्या करता येतील.
QR कोडद्वारे सुरक्षित डिजिटल आधार शेअरिंग
UIDAI च्या नव्या अॅपमुळे वापरकर्ते QR कोडद्वारे आपला ई-आधार शेअर करू शकणार आहेत. यामध्ये दोन पर्याय असतील – पूर्ण आधार किंवा Masked Aadhaar (लपवलेला आधार नंबर) शेअर करता येणार आहे. यामुळे ओळख सुरक्षित राहणार असून, अनधिकृत वापर टाळता येणार आहे.
आधार सेंटरची गरज कमी
UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, फिंगरप्रिंट व आयरिस ओळख वगळता, इतर सर्व अपडेट्स नव्या अॅपवरून घरबसल्या करता येतील. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आणि जन्मतारीख यांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशभरात हे तंत्रज्ञान लागू केले जाण्याची शक्यता आहे.
नवीन पद्धतीने दस्तऐवजांची पडताळणी
UIDAI कडून आता दहावीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, PAN, मनरेगा व PDS डेटाबेस यामधूनच माहिती घेतली जाईल. यामुळे बनावट कागदपत्रांच्या वापराला आळा बसेल. वीजबिल डेटाबेस जोडण्याचा विचारही सुरू आहे.
प्रॉपर्टी व्यवहारातही आधारचे महत्त्व
UIDAI आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आधार वापरण्यासाठी राज्य सरकारांना प्रवृत्त करत आहे. यामुळे खोटी नावे व फसवणूक टाळता येईल. सब-रजिस्ट्रार व रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये आधार आधारित व्हेरिफिकेशन करता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम
UIDAI ने CBSE व इतर बोर्डांशी संपर्क साधला आहे. ५–७ आणि १५–१७ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यासाठी ८ कोटी आणि १० कोटी नागरिकांचे बायोमेट्रिक अपडेट करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
सुरक्षितता आणि गोपनीयतेला प्राधान्य
नागरिकांना त्यांच्या डेटावर अधिक नियंत्रण देणे. वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कुणीही आधार माहिती वापरू शकणार नाही. हॉटेल, ट्रेन, सरकारी सेवा, आणि खासगी कंपन्यांमध्ये आधार शेअरिंग अधिक सुलभ आणि सुरक्षित कारणे हा UIDAI चा उद्देश आहे.
हेही वाचा : पीक विमा योजनेत मोठा बदल! हे काम पूर्ण केल नसल्यास अर्ज होणार रद्द.