UPI Fraud Risk Numbers Blocked FRI System : डिजिटल पेमेंटचा वापर वाढल्याने सायबर फसवणूक करणाऱ्यांनीही नव्या क्लुप्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यामुळे आता UPI व्यवहार करताना काही विशिष्ट मोबाइल नंबर थेट ब्लॉक होणार आहेत. पण हे नंबर कोणते आहेत आणि हे नवे नियम नेमके कसे काम करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टेलिकॉम विभागाने ‘Financial Fraud Risk Indicator’ (FRI) हे नवे टूल लॉन्च केले आहे. हे टूल मोबाइल नंबरचे ‘रिस्क स्कोअर’ तपासत आणि त्याला तीन वर्गांमध्ये विभागत – मध्यम, उच्च आणि अतिउच्च धोका. जर एखादा नंबर सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले, तर त्यावरून होणारे डिजिटल व्यवहार रोखले जातील.
FRI स्कोअर तयार करताना भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), DOT चा चक्षु पोर्टल, बँका व इतर संस्थांकडून मिळालेल्या डेटावर आधारित माहितीचा वापर केला जातो. या स्कोअरच्या आधारे संबंधित बँका आणि UPI सेवा पुरवठादार कंपन्या अलर्ट होतात आणि व्यवहार थांबवण्याची प्रक्रिया सुरू होते.
PhonePe हे भारतातील पहिले असे UPI अॅप ठरले आहे, ज्याने FRI प्रणाली स्वीकारली आहे. कंपनीने सांगितले की ‘Very High Risk’ श्रेणीत असलेल्या नंबरवरून होणारे व्यवहार आता आपोआप थांबवले जातील. शिवाय, वापरकर्त्यांना अॅपवरच सतर्कतेचा इशारा दाखवला जाईल.
याशिवाय, Mobile Number Revocation List (MNRL) तयार करून अशा नंबरची माहिती सर्व बँकांना दिली जात आहे. हे नंबर बहुतेक वेळा काहीच दिवस सक्रिय असतात आणि नंतर फसवणुकीसाठी वापरले जातात.
UPI वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. अनोळखी नंबरवरून आलेल्या पेमेंट लिंकवर क्लिक करणे किंवा फोनवरून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना आता अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
🔴 हेही वाचा 👉 अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ कायम; सुधारित वेळापत्रक उद्या होणार जाहीर.