UPI New Rule : भारतातील डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यूपीआयसंदर्भात एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. तुम्ही जर Google Pay, PhonePe, Paytm किंवा BHIM सारख्या UPI अॅप्सचा वापर करत असाल, तर हा होणारा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
३० जून २०२५ पासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांनुसार, यूपीआयद्वारे व्यवहार करताना तुम्हाला समोरच्याचे बँकेमध्ये नोंदवलेले खरे नाव (real registered name) दिसणार आहे. आतापर्यंत फक्त निकनेम किंवा अॅपवर सेव केलेले नाव दिसत होते, जे अनेकदा फसवणुकीस कारणीभूत ठरत होते.
या नव्या प्रणालीमुळे युजर्सना व्यवहार करताना खात्री करता येईल की पैसे योग्य व्यक्तीला पाठवले जात आहेत. यामुळे P2P (व्यक्ती ते व्यक्ती) आणि P2M (व्यक्ती ते व्यवसाय) अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढेल.
NPCI ने याबाबत सांगितले आहे की, QR कोड स्कॅन केल्यानंतर किंवा UPI ID टाकल्यावर, संबंधित व्यक्तीचे बँकेत नोंदवलेले नावच स्क्रीनवर दिसेल. या बदलामुळे यूपीआय फसवणूक कमी होईल, आणि युजर्सचा विश्वास आणखी वाढेल.
भारतामध्ये सध्या यूपीआय युजर्सची संख्या १७.८९ अब्जपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अशा सुरक्षाविषयक सुधारणांची अत्यंत गरज निर्माण झाली होती.
🔴 हेही वाच 👉 महाराष्ट्र कुक्कुटपालन योजना; मिळणार १० लाखांपर्यंतचे कर्ज आणि अनुदान.