UPI Payment Without Internet Ussd 99 Npci : डिजिटल व्यवहार आता फक्त इंटरनेटपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. इंटरनेट नसतानाही UPI व्यवहार करता येतो, हे अनेकांना माहिती नसल्याने अनेक वेळा व्यवहार अडकतात. पण आता *99# डायल करून, USSD तंत्रज्ञानाच्या आधारे UPI व्यवहार ऑफलाइन देखील करता येणार आहे.
काय आहे *99# USSD सेवा?
भारतीय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ने *99# सेवा सुरू केली असून ती GSM नेटवर्कवर आधारित USSD (Unstructured Supplementary Service Data) प्रणालीवर चालते. यामध्ये इंटरनेटची आवश्यकता नसते. ही सेवा देशभरात सुमारे 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि बेसिक मोबाइल फोनवरही वापरता येते.
ऑफलाइन UPI व्यवहार कसा करायचा?
- आपल्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा
- पसंतीची भाषा निवडा
- बँकेचा IFSC कोड भरा किंवा खाते निवडा
- बँक खाते लिंक करा
- डेबिट कार्डचे शेवटचे 6 अंक व समाप्ती तारीख द्या
- UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण करा
ही सेवा पैसे पाठवणे, बॅलन्स तपासणे, UPI ID मॅनेज करणे यासाठी उपयुक्त आहे. हे सगळे केवळ काही सेकंदांत पूर्ण होते, आणि विशेषतः ग्रामीण व कमी कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांत ही सेवा फार प्रभावी ठरते.
USSD सेवा का उपयुक्त आहे?
इंटरनेट नसेल तरी व्यवहार थांबत नाही
स्मार्टफोन नसतानाही व्यवहार करता येतो
ग्रामीण, दुर्गम भागातील वापरकर्त्यांसाठी फायदेशीर
NPCI व TRAI यांची मान्यता असल्याने सुरक्षित व खात्रीशीर
वापरकर्त्यांनी काय लक्षात ठेवावे?
ही सेवा फक्त रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरच चालते
तुमचा UPI PIN कोणालाही सांगू नका
व्यवहारानंतर मेसेजद्वारे खात्री मिळते
ही सेवा फक्त GSM नेटवर्कसाठी आहे, VoLTE किंवा इंटरनेट कॉलिंग नेटवर्कवर काम करत नाही
हेही वाचा : स्पॅम कॉल्समुळे त्रास होतोय? हे सरकारी अॅप ठरेल उपयुक्त.