मुंबई, १६ जून २०२५ : UPI Speed Upgrade June 2025 – भारतातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आता अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आजपासून एक महत्वाचा प्रणाली सुधारणा अपडेट लागू केला असून, यामुळे UPI व्यवहार ६६ टक्क्यांपर्यंत अधिक जलद होतील.
काय बदलणार?
या नव्या अपडेटनंतर, Google Pay, PhonePe, Paytm UPI, BHIM, WhatsApp UPI यांसारख्या सर्व प्रमुख UPI सेवा अधिक कार्यक्षम बनतील. व्यवहार प्रक्रिया करताना यापुढे कमी वेळ लागेल आणि चुकांची शक्यता देखील कमी होईल.
NPCI च्या माहितीनुसार, Request Pay/Response Pay ची वेळ आता ३० सेकंदांवरून १५ सेकंदांवर आली आहे. तसेच, व्यवहार रद्द करण्याची वेळ केवळ १० सेकंद झाली आहे. Check Status आणि Address Validation सारख्या API सेवा देखील आता १० सेकंदांत पूर्ण होतील.
बँक आणि ग्राहकांना काय फायदा?
या सुधारणा केवळ वापरकर्त्यांना नाही तर बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांनाही (PSPs) मोठा फायदा देतील. व्यवहारांच्या वेळेत होणारा विलंब आता टळणार आहे.
UPI चा झपाट्याने वाढणारा वापर
UPI व्यवहारांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या तांत्रिक सुधारणांचा उद्देश प्रणालीचे स्थैर्य वाढवणे, सर्व्हरवरील ताण कमी करणे आणि प्रत्येक व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी आधारभूत संरचना मजबूत करणे हा आहे.
हेही वाचा : UIDAI च नवीन अॅप, आता घरबसल्या आधार अपडेट शक्य, नाव ते मोबाईल नंबर सर्व बदल करता येणार.