UPI Transaction Failed Money Stuck Guide : देशात UPI व्यवहारांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, अनेक वेळा PhonePe, Google Pay, Paytm सारख्या अॅप्सवर व्यवहार अडकतात. पैसे खात्यातून वजा होतात पण समोरील व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी वापरकर्ते तक्रार करून पैसे परत मिळवू शकतात.
UPI ट्रान्झॅक्शन अडकल्यास काय करावे?
जर तुमच्या खात्यातून पैसे गेले आणि रिसिव्हरला पोहोचले नाहीत, तर आधी त्यांच्याशी संपर्क साधून याची खात्री करा. सामान्यतः अशा व्यवहारांचे उत्तर 60 सेकंदांत अॅपमध्ये मिळते. जर पेमेंट ‘पेंडिंग’ दिसत असेल तर UPI सेवा प्रदात्याशी (PhonePe, Google Pay, Paytm) संपर्क करा.
अॅपमध्ये तक्रार कशी करावी?
- वापरलेल्या अॅपमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्टरीमध्ये जा.
- संबंधित व्यवहार निवडा आणि त्यात ‘रॉन्ग ट्रान्झॅक्शन’ किंवा ‘डिस्प्यूट’ पर्याय निवडा.
- ट्रान्झॅक्शन आयडी, UPI ID, रक्कम, तारीख आणि वेळ इत्यादी तपशीलासह तक्रार नोंदवा.
Bank, NPCI आणि RBI कडे तक्रार
जर अॅपमधून तुमची समस्या सुटली नाही, तर:
लँडर बँकेशी संपर्क करा. UPI साठी प्रत्येक बँकेकडे स्वतंत्र तक्रार निवारण प्रणाली असते.
बँक तुमच्याकडून लिखित तक्रार मागवू शकते किंवा तुम्हाला शाखेला भेट देण्यास सांगू शकते.
बँक विलंब करत असेल, तर तुम्ही NPCI (National Payments Corporation of India) कडे तक्रार करू शकता.
NPCI वर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Dispute Redressal’ सेक्शनमध्ये ट्रान्झॅक्शन तपशील द्या आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
जर NPCI कडूनही उत्तर मिळाले नाही, तर 30 दिवसानंतर तुम्ही RBI (Reserve Bank of India) कडे तक्रार दाखल करू शकता.
सुरक्षित UPI वापरासाठी महत्त्वाच्या सूचना
पेमेंट करण्याआधी UPI ID आणि नाव नीट तपासा.
QR कोड स्कॅन करताना फसवणुकीपासून सावध रहा.
अनोळखी UPI लिंकवर क्लिक करू नका.
हेही वाचा : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा: ‘पिएम पोषण’ योजनेत दरवाढ लागू.