भारतात आता आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड चालणार नाहीत! आता नागरिकत्वाचा पुरावा म्हणून चालणार फक्त ‘हे’ Voter ID And Passport Valid Proof

2 Min Read
Voter ID And Passport Valid Proof Of Citizenship India

Voter ID And Passport Valid Proof Of Citizenship India : केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आता भारतात नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड चालणार नाहीत.

सरकारने हा निर्णय अवैध प्रवाशांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेदरम्यान असे समोर आले आहे की, बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवले होते. त्यामुळे आता नागरिकत्वाच्या सिद्धतेसाठी अधिक विश्वासार्ह पुराव्यांची गरज भासवू लागल्याने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे यामागच कारण?

समोर आलेल्या माहितीनुसार, आधार, पॅन आणि रेशन कार्ड ही ओळख दर्शवणारी कागदपत्रे असली, तरी ती नागरिकत्व सिद्ध करत नाहीत. अशा खोट्या कागदपत्रांचा गैरवापर करून परदेशी नागरिकांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातही आता अशी बनणार अंतिम यादी; सरकारचा स्पष्ट संदेश.

नवीन नियमाचा काय होणार परिणाम?

या निर्णयामुळे आधार किंवा पॅन कार्डला नागरिकत्वाचा पुरावा मानले जाणार नाही. आता सरकारी सेवा, सरकारी योजना, आणि इतर महत्वाच्या शासकीय प्रक्रियांमध्ये Voter ID किंवा पासपोर्टच (Voter ID And Passport) चालणार आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल आहे की, येत्या काळात फक्त Voter ID आणि Passport च नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मान्य असणार आहेत आणि त्यामुळे सर्व नागरिकांनी आपले Voter ID किंवा पासपोर्ट अपडेट करून ठेवण आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 आनंदाची बातमी! आता मिळणार मोफत वाळू, राज्यभरात अंमलबजावणी सुरू.

Share This Article