Weather Forecast App: आपल्या गावात पाऊस पडणार का? शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज आता घरबसल्या मोबाईलवर

2 Min Read
Weather Forecast App For Farmers

Weather Forecast App For Farmers : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाचे वातावरण कधीही बदलू शकते. यंदा मे महिन्याच्या मध्यातच अवकाळी पावसाने थैमान घातले आणि अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत हवामानाचा अचूक अंदाज मिळण हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेच आहे. पावसाच्या आगमनाची माहिती जर वेळेवर मिळाली, तर शेतकरी आपल्या शेतीच आणि साठवलेल्या मालाच संरक्षण करू शकतात. सुदैवाने आता शेतकऱ्यांना घरबसल्या हवामानाचा अंदाज मिळवण्यासाठी अनेक डिजिटल पर्याय उपलब्ध झाले आहेत.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि इतर खाजगी संस्था नियमितपणे हवामानाचे अपडेट्स देत असतात. विशेषतः जिल्हानिहाय पावसाची शक्यता, यलो अलर्ट किंवा रेड अलर्टसारख्या महत्वाच्या सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतात. या वेबसाईटवरून शेतकरी आपल्या गावातील अंदाज तपासू शकतात आणि त्यानुसार तयारी करू शकतात.

याशिवाय ‘मेघदूत’ अ‍ॅपसारखे (Meghdoot App) काही विशेष मोबाईल अ‍ॅप्सदेखील आता शेतकऱ्यांच्या सेवेत आहेत. भारतीय हवामान विभाग आणि उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने संयुक्तपणे विकसित केलेल हे अ‍ॅप शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज तसेच कृषी सल्ला देत. केवळ एका क्लिकवर या अ‍ॅपमधून दररोजच हवामान, जमिनीची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि संभाव्य पावसाचा अंदाज मिळतो. ही माहिती शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करत.

सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विषयक अचूक माहिती मिळण ही शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनली आहे. सरकारच्या अधिकृत स्रोतांचा वापर आणि ‘मेघदूत’ अ‍ॅपच्या माध्यमातून मिळणारी माहिती ही आधुनिक शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता या डिजिटल पर्यायांचा लाभ घेतला पाहिजे.

हेही वाचा : लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पुनः पडताळणी सुरू, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई निश्चित.

Share This Article