10th Pass Government Job Registration : राज्यातील बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने अनेक तरुण शासकीय नोकरीच्या संधी शोधत आहेत. अशा परिस्थितीत, शासनाने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. महास्वयंम पोर्टल (Mahaswayam Portal) वर नोंदणी केल्यास विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात. नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार मेळावे, कौशल्यविकास प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि विविध सरकारी योजना यांचा लाभ मिळतो.
नोंदणी प्रक्रियेनंतर उमेदवाराला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि त्याआधारे त्यांना शासकीय योजनांत सहभाग घेता येतो. हे नोंदणी प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरते. विशेष म्हणजे, यामुळे उमेदवारांना वेळोवेळी नोकरीच्या संधींबाबत माहिती मिळत राहते.
नोंदणीसाठी आवश्यक बाबी:
नाव, जन्मतारीख, पत्ता, जिल्हा, तालुका
शैक्षणिक पात्रता (किमान दहावी उत्तीर्ण)
आधार क्रमांक, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक
फोटो आणि ओळखपत्र
नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जतन करून ठेवावे. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा.
🔴 हेही वाचा 👉 या लाडक्या बहिणींसाठी ३३५ कोटींचा निधी मंजूर, आदेश जारी, लवकरच खात्यात जमा होणार पैसे.