Air Force Recruitment 2025: दहावी व बारावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; १५ जूनपर्यंत करा अर्ज

2 Min Read
Air Force Recruitment 2025 Group C Posts Apply Now

Air Force Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात (Air Force) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. एअर फोर्सने ग्रुप C सिव्हिलियन पदांसाठी भरती जाहीर केली असून, देशभरातील इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क, हिंदी टायपिस्ट, कुक, स्टोअर कीपर, कारपेंटर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आदी पदांचा समावेश आहे.

एकूण 148 रिक्त जागा उपलब्ध असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2025 आहे.

Air Force Recruitment 2025 साठी कोण अर्ज करू शकतो?

या भरतीसाठी 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): किमान 12वी पास आणि टायपिंग टेस्ट अनिवार्य
हिंदी टायपिस्ट: 12वी पास आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक
स्टोअर कीपर: 12वी पास
कुक, पेंटर, कारपेंटर, MTS (मल्टी टास्किंग स्टाफ): 10वी पास

वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गासाठी सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Air Force Bharti 2025 अर्ज कसा करायचा?

ही भरती पूर्णतः ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे:

Air Officer Commanding, Air Force Station Arjan Singh, Panagarh, West Bengal – 713148
तसेच काही पदांसाठी तेजपूर (आसाम), वेस्टर्न एअर कमांड आणि सेंट्रल अकाउंट्स ऑफिस येथेही भरती होणार आहे.

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 जून 2025
भरती प्रक्रिया: शॉर्टलिस्टिंग, लिखित परीक्षा आणि स्किल टेस्ट (पदावर अवलंबून)

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये? नवीन अपडेट जाणून घ्या.

Share This Article