Bank Jobs: बँकेत दहावी पास उमेदवारांसाठी भरती, ₹३७,८१५ पर्यंत पगार; अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५

2 Min Read
Bank Job 10th Pass 2025 Recruitment

Bank Job 10th Pass 2025 Recruitment : देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती शिपाई पदासाठी असून देशभरात एकूण ५०३ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात या भरतीअंतर्गत २९ जागा उपलब्ध असून स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असण आवश्यक आहे.

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुक उमेदवारांना २३ मे २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे. म्हणजेच, १ मे १९९९ पूर्वी जन्म झालेल्या उमेदवारांना या भरतीसाठी पात्र मानले जाणार नाही.

बँक ऑफ बडोदामधील या शिपाई पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी असे दोन टप्पे असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹१९,५०० ते ₹३७,८१५ पर्यंत पगार दिला जाणार आहे. अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹६०० इतक शुल्क आकारण्यात येईल, तर अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि अपंग उमेदवारांना फक्त ₹१०० अर्ज शुल्क द्याव लागेल.

जर आपण पात्र असाल आणि सरकारी बँकेत नोकरी (Government Job) करण्याची इच्छा असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

🔴 हेही वाचा 👉 20 रुपयांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय! 20 रुपयांची नोट बदलणार!.

Share This Article