Bank Jobs: सरकारी नोकरीची संधी – सेंट्रल बँकेत परीक्षा न देता थेट भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून

2 Min Read
Central Bank Of India Recruitment Without Exam 2025

Central Bank Of India Recruitment Without Exam 2025 : सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांसह फ्रेशर्ससाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ मुलाखतीच्या आधारे थेट निवड केली जाणार आहे.

या भरतीअंतर्गत एफएलसी काउंसिलर आणि बीसी सुपरवायझर या दोन पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २१ मेपासून सुरू झाली असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ४ जून २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज पाठवावा.

एफएलसी काउंसिलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवीधर पदवी असावी, त्यासोबतच संगणक ज्ञान, एमएस ऑफिस, इंटरनेट व स्थानिक भाषेतील टायपिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराने पूर्वी राष्ट्रीयकृत बँकेत किंवा ग्रामीण बँकेत अधिकारी पदावर काम केलेले असावे. सेवानिवृत्त किंवा व्हीआरएस घेतलेले अधिकारी देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

दुसरीकडे, बीसी सुपरवायझर पदासाठी फक्त निवृत्त कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर फ्रेशर्सनाही संधी आहे. या पदासाठी M.Sc (IT), BE (IT), MCA किंवा MBA पात्रता धारकांना प्राधान्य दिले जाईल. फ्रेश उमेदवारासाठी वयोगट २१ ते ४५ वर्षे आणि रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी ६० ते ६४ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

निवड प्रक्रियेसाठी केवळ मुलाखत घेतली जाईल. एफएलसी काउंसिलर पदासाठी २५,००० रुपये आणि बीसी सुपरवायझर पदासाठी १५,००० रुपये मासिक पगार देण्यात येईल. ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तिरुवनंतपुरम शाखेसाठी होत आहे.

अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.centralbankofindia.co.in भेट द्यावी लागेल. अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा असून तो दिलेल्या पत्त्यावर –
Regional Office, Second Floor, CS Building, Pulimoodu, MG Road, Thiruvananthapuram, Kerala – 695001 – या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना.

Share This Article