Teachers Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यात शिक्षक भरतीचा नवा फॉर्म्युला: आदिवासी आश्रमशाळांमध्ये १७९१ पदांसाठी कंत्राटी शिक्षकांची भरती

1 Min Read
Contract Teachers Recruitment In Maharashtra Ashram Schools 2025

Contract Teachers Recruitment In Maharashtra Ashram Schools 2025 : महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये तब्बल १७९१ शिक्षक पदे बाह्य स्रोतांद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी GeM (Government e-Marketplace) या अधिकृत पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी ८४ कोटी ७४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित निर्णयाचा शासन आदेश जारी करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रात यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या कंत्राटी भरतीत २२९ उच्च माध्यमिक शिक्षक, ४५५ माध्यमिक शिक्षक, १२० पदवीधर प्राथमिक शिक्षक, १७८ प्राथमिक शिक्षक (इंग्रजी) आणि ८०९ प्राथमिक शिक्षक (मराठी) या पदांचा समावेश आहे. ही भरती १६ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात येत असून, अद्याप संबंधित पदे भरली गेली नसल्याचे स्पष्ट होते.

सध्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारित ४९७ शासकीय आणि ५५६ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळा दुर्गम आणि डोंगराळ भागांतील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देतात. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 दहा हजार रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या आणि बंदही झाल्या! जाणून घ्या अजब कहाणी.

Share This Article