MPSC Pashusavardhan Vibhag Bharti : पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त पदासाठी ३११ रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जून २०२५ आहे.
राज्यातील अनेक तरुणांचे सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असते आणि ते त्यासाठी सतत संधी शोधत असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पशुसंवर्धन विभागाने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.
या पदभरतीमुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना विभागाकडून चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्याची प्रक्रिया झाली होती. आता त्याच धर्तीवर ही नवीन भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या भरतीसाठी विशेष पाठपुरावा केला असून विभागाला पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन सेवा अधिक सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Pashusavardhan Vibhag MPSC Bharti 2025 महत्त्वाचे मुद्दे:
एकूण पदे: ३११ (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन)
भरती संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
अर्जाची अंतिम तारीख: २० जून २०२५
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतरस्ते आता किमान ३ ते ४ मीटर रुंद होणार – महसूल विभागाचा मोठा निर्णय.