‘या’ महिलांचा लाभ रोखला – अदिती तटकरे यांच स्पष्टिकरण Aditi Tatkare Clarifies Majhi Ladki Bahin Yojana Verification

2 Min Read
Aditi Tatkare Clarifies Majhi Ladki Bahin Yojana Verification

Aditi Tatkare Clarifies Majhi Ladki Bahin Yojana Verification : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निवडीबाबत गेल्या काही दिवसांत प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात असतानाच, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाच स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी ट्वीट करत स्पष्ट केल आहे की, लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही शासकीय योजनेची नियमित आणि आवश्यक प्रक्रिया आहे, आणि याच प्रक्रियेत सुमारे २ लाख अर्जांची छाननी केल्यानंतर त्यात २२८९ शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केल्याच समोर आल आहे.

अदिती तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केल आहे की, “या प्रकाराची माहिती जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच समोर आली होती आणि तेव्हापासून या अर्जदारांना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.” याचा अर्थ असा की, प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलून अपात्र व्यक्तींचा लाभ रोखला आहे.

माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, तिचा उद्देश राज्यातील गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे. या योजनेचा लाभ खरच गरजूंनाच मिळावा यासाठी अर्जांची सतत पडताळणी केली जात असल्याच तटकरे यांनी सांगितल.

त्यांनी पुढे स्पष्ट केल की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे.”

राज्यात या योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले असून, प्रशासन पातळीवर पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने पडताळणी केली जात आहे. काही अपात्र महिलांनी या योजनेत नावनोंदणी केली असली, तरी त्यांना लाभ नाकारण्यात आलेला आहे हे त्यांनी स्पष्ट केल.

हेही वाचा : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या 1 रुपयाच्या नाण्यापासून ते 500 रुपयांच्या नोटांपर्यंत छपाईसाठी किती खर्च येतो.

Share This Article