Inter Caste Marriage Scheme : डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना, जी २०१४-१५ पासून सुरू होती आणि त्याअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ₹2.5 लाख रुपये अर्थसहाय्य दिल जात होत, ती केंद्र सरकारने अचानक बंद केली आहे.
काय आहे योजना?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेतून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची (SC) असण आवश्यक होत. विवाहानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करून, समाजकल्याण विभागाकडे संपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास अर्थसहाय्य दिल जायच.
योजना बंद का झाली?
ही योजना बंद करण्यामागे कोणतही अधिकृत कारण देण्यात आलेल नाही. मात्र, अर्ज करणाऱ्या पात्र जोडप्यांना समाजकल्याण विभागाने थेट पत्र पाठवून योजना बंद झाल्याचे कळवले आहे. याशिवाय, सामाजिक न्याय आयुक्तालयाने सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याच कळवल आहे.
संकेतस्थळावर माहिती अद्ययावत नाही
Ambedkar Foundation च्या अधिकृत संकेतस्थळावर ही योजना अद्याप सुरू असल्याच दर्शवल जात आहे, मात्र प्रत्यक्षात ती बंद करण्यात आली आहे.
भारतात ‘आंतरजातीय विवाह’ किती होतात?
भारतात आंतरजातीय विवाहांच प्रमाण केवळ ५ टक्के आहे. जाती-धर्माच्या बंधनांमुळे आजही समाजात हे विवाह दुर्मीळच मानले जातात.
निष्कर्ष:
एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेमुळे हजारो जोडप्यांना आर्थिक मदत मिळत होती. पण ही योजना आता थांबवण्यात आली असून, केंद्राकडून अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. अर्जदारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत विभागाकडून खात्री करावी.
🔴 हेही वाचा 👉 दिवसाला ₹10,000 कमावण्याची संधी देणारी ‘नवी सरकारी योजना’ काय आहे? जाणून घ्या सत्य.