Atal Pension Yojana Apply Online : भविष्यकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना (APY) सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. ही योजना तुम्हाला ६० वर्षांनंतर दरमहा १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची हमी देते.
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?
जर तुम्ही १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक असाल आणि तुमच बँक खात सक्रिय असेल, तर तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. या योजनेत सहभागी होण्यासाठी दरमहा एक निश्चित प्रीमियम भरावा लागतो. उदा. जर एखादा व्यक्ती १८व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला, तर त्याला दरमहा फक्त २१० रुपये गुंतवून, ६० वर्षांनंतर त्याला ५,००० रुपये पेन्शन मिळू शकते.
अटल पेन्शन योजनेचे फायदे
६० वर्षांनंतर आजीवन निश्चित पेन्शन
सरकारी हमीसह सुरक्षित गुंतवणूक
कर बचतीसाठी IT कलम 80CCD अंतर्गत लाभ
मृत्यूनंतर कुटुंबियांना पेन्शन किंवा संपूर्ण रक्कम परत मिळवण्याचा अधिकार
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- बँकेला भेट द्या – ज्या बँकेत तुमच खाते आहे, तिथे जाऊन संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा.
- फॉर्म भरणे – बँक अधिकारी तुमच्याकडून आवश्यक माहिती घेऊन फॉर्म भरतील.
- प्लान निवडा – तुम्हाला किती रुपये पेन्शन हवी आहे (१,००० ते ५,००० पर्यंत) हे ठरवा.
- बँक खाते लिंक करा – प्रीमियम कट होण्यासाठी तुमच खात लिंक केल जात.
महत्त्वाचे
या योजनेसाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागत नाही.
प्रीमियम तुमच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शन रकमेवर आधारित असतो.
तुमच्या निधनानंतर, लाभार्थी म्हणून नमूद व्यक्तीला पेन्शन किंवा संपूर्ण रक्कम मिळते.
भविष्याची आर्थिक सुरक्षितता हवी असेल, तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) हा एक उत्तम पर्याय आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, छोट्या व्यावसायिकांसाठी आणि ग्राहिनींसाठी ही योजना एक आर्थिक आधारस्तंभ ठरू शकते.
🔴 हेही वाचा 👉 रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना: ३० जूनपूर्वी पूर्ण करा हे काम, अन्यथा मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ.