APY : मिळवा दर महिन्याला ५ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी?

2 Min Read
Atal Pension Yojana Monthly Benefits 5000 Rupees

Atal Pension Yojana Monthly Benefits 5000 Rupees : अर्थसहाय्याची गरज भासणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजना (APY) ही एक अत्यंत उपयुक्त आणि दीर्घकालीन फायदेशीर योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत सामील होऊ शकतात आणि वयोमानानुसार निवृत्तीनंतर दर महिन्याला १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळवू शकतात.

अटल पेन्शन योजना कशी काम करते?

अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाते. यामध्ये सहभागी व्यक्तीने ६० वर्षे वय पूर्ण होईपर्यंत मासिक प्रीमियम भरावा लागतो. योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची हमी देणे हा आहे.

उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती १८ व्या वर्षी योजनेत सामील होऊन दरमहा ₹२१० इतकी रक्कम जमा करत असेल, तर त्याला ६० वर्षांनंतर दर महिन्याला ₹५,००० इतकी पेन्शन मिळू शकते. प्रीमियम थेट बँक खात्यातून कापला जातो.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

निवृत्तीनंतरचे आर्थिक संरक्षण: ६० वर्षांनंतर काम करण्याची शारीरिक क्षमता कमी झाल्यावर नियमित पेन्शनमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते.
किमान २० वर्षे गुंतवणूक आवश्यक: दीर्घकालीन नियोजन करणाऱ्यांसाठी ही योजना योग्य पर्याय आहे.
सुलभ प्रक्रिया: बँकेमार्फत सोपी KYC प्रक्रिया आणि खाते उघडण्याची सुविधा.
सरकारी हमी: निवडलेल्या पेन्शन प्लॅन प्रमाणे सरकारकडून निश्चित पेन्शनची हमी मिळते.

योजनेत सहभागी होण्यासाठी काय आवश्यक?

वय: अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
नागरिकत्व: अर्जदार भारतीय नागरिक असावा.
बँक खाते: अर्जदाराचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक.
अर्ज प्रक्रिया: जवळच्या बँकेत जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

एकदा योजना सुरु झाल्यानंतर, निवडलेला प्रीमियम दरमहा खात्यातून आपोआप कापला जातो. आणि ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ठराविक पेंशन जमा होऊ लागते.

अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगार, लघु व्यापारी आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आर्थिक निवृत्तीची खात्री देणारी एक फायदेशीर सरकारी योजना आहे. कमी वयात गुंतवणूक सुरु केल्यास, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरते.

हेही वाचा : शासकीय निर्णयांवर सोशल मीडियावर पोस्ट केल्यास कारवाई होणार – अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवे निर्बंध लागू.

Share This Article