मोफत उपचारासाठी ‘हे’ कार्ड आहे अत्यंत उपयुक्त! जाणून घ्या कार्ड मिळवण्याची सोपी प्रक्रिया

2 Min Read
Ayushman Card Apply Process Benefits

Ayushman Card Apply Process Benefits : भारत सरकारकडून राबवण्यात येणारी ‘आयुष्मान भारत योजना’ (Ayushman Bharat Yojana) ही गरीब व गरजू नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ‘आयुष्मान कार्ड’ आवश्यक असते. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही ‘आयुष्मान कार्ड सहज मिळवू शकता.

आयुष्मान भारत योजनेचा मुख्य उद्देश गरीब व गरजू नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हा आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या योजनेत, ‘आयुष्मान कार्ड’धारक नागरिकांना देशातील निवडक खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळतो. यामध्ये हॉस्पिटलायझेशन, शस्त्रक्रिया, औषधे, तपासण्या यांचा समावेश आहे.

आयुष्मान कार्डसाठीची पात्रता तपासण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in या संकेतस्थळावर जावा. येथे ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती भरून पात्रता तपासा. जर तुम्ही पात्र असाल तर आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या CSC (Common Service Center) सेंटरला भेट देऊन तुमचे आयुष्मान कार्ड बनवून घेऊ शकता.

🔴 हेही वाचा 👉 तुमच्या पक्क्या घराच स्वप्न आता साकार होणार; ‘पीएम आवास योजने’साठी अर्जाची अंतिम तारीख वाढली.

CSC सेंटरमध्ये अधिकृत प्रतिनिधीकडे आपण अर्ज करताच, सर्वप्रथम तुमची पात्रता पडताळली जाते. पात्रता तपासल्यानंतर तुमच्याकडून आधार कार्ड, रेशन कार्ड, पत्त्याचा पुरावा यांसारखी आवश्यक कागदपत्र घेतले जातात आणि त्यांची पडताळणी केली जाते. सर्व माहिती योग्य असल्यास, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि त्यानंतर काही काळातच तुमचे आयुष्मान कार्ड तयार केले जाते, जे तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून वापरू शकता.

आयुष्मान कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. यासाठी कोणतेही हॉस्पिटल बिल भरण्याची गरज नाही. ही योजना आरोग्य क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल असून, लाखो गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.

🔴 हेही वाचा 👉 बँकेत दहावी पास उमेदवारांसाठी भरती, ₹३७,८१५ पर्यंत पगार; अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५.

Share This Article