2025 मध्ये कुणाला ‘आयुष्मान कार्ड’ मिळू शकत नाही? योजनेच्या पात्रता अटी जाणून घ्या Ayushman Card Eligibility And Non Eligible List

2 Min Read
Ayushman Card Eligibility And Non Eligible List 2025

Ayushman Card Eligibility And Non Eligible List 2025 : भारत सरकारच्या ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजने’अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आयुष्मान कार्ड’ (Ayushman Card) आवश्यक असते. मात्र, अनेक नागरिकांना अद्यापही हे कार्ड अजूनही मिळालेल नाही, किंवा त्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पात्रतेचे निकष पूर्ण न करणे.

कोण पात्र आहेत?

आयुष्मान भारत योजनेसाठी खालील व्यक्तींना पात्र मानले जाते:

असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार
आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिक
ज्यांनी आधीपासून कोणत्याही सरकारी आरोग्य योजनेचा लाभ घेतलेला नाही
दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटुंबातील सदस्य
अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक
निराधार किंवा आदिवासी
रोजंदारीवर काम करणारे श्रमिक
७० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक

कोण पात्र नाहीत?

पात्रतेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींची यादी:

संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी
ज्यांच्याकडे ईएसआयसी (ESIC) कार्ड आहे
पीएफ कपात होणारे कामगार
जे आर्थिकदृष्ट्या सधन आहेत
सरकारी नोकरीत कार्यरत असलेले
जे नियमितपणे इनकम टॅक्स भरतात

Ayushman Card साठी पात्रता कशी तपासायची?

आपली पात्रता तपासण्यासाठी https://pmjay.gov.in या संकेतस्थळावर जा. ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही पात्र आहात कि नाही ते कळू शकते.

आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे?

जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जा
तेथे तुमची पात्रता तपासली जाईल
आवश्यक कागदपत्रे सादर करा व त्याची पडताळणी करा
सर्व माहिती योग्य आढळल्यास अर्ज दाखल करून घेतला जाईल
त्यानंतर काही काळात तुमचे आयुष्मान कार्ड जारी केले जाते

आयुष्मान कार्ड मिळाल्यावर, तुम्ही दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर विलंब न करता अर्ज करा.

🔴 हेही वाचा 👉 महावितरणने जाहीर केला ‘हाय अलर्ट’ – आपत्कालीन परिस्थितीत या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

Share This Article