तुम्ही ‘आयुष्मान कार्ड’साठी पात्र आहात का? पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Ayushman Card Eligibility Apply Online

2 Min Read
Ayushman Card Eligibility Apply Online Benefits Process

Ayushman Card Eligibility Apply Online : वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणाऱ्या ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजने’चा लाभ घ्यायचाय? पण तुम्ही पात्र आहात की नाही हे माहित नाही? तुम्ही पात्र आहात कि नाही, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि योजनेचे फायदे येथे जाणून घ्या.

आयुष्मान कार्ड काय आहे?

सरकारकडून ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड दिले जाते. या कार्डच्या माध्यमातून सरकारी आणि नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतो. ही योजना गरजू आणि गरीब कुटुंबांसाठी आरोग्य सुरक्षेचा एक मोठा आधार ठरते आहे.

Ayushman Card साठी तुम्ही पात्र आहात का? पात्रता कशी तपासावी?

तुमची पात्रता तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  2. मुख्य पेजवर ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा
  3. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, राज्य, आणि इतर काही माहिती भरा
  4. काही सेकंदांत तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही हे दिसेल

Ayushman Card मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा?

जर तुम्ही पात्र असाल तर पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही Ayushman कार्ड मिळवू शकता:

तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर (CSC Center) जा
तेथे अधिकारी तुमची पात्रता पुन्हा एकदा तपासतील
लागणारी कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड इ.) जमा करा
योग्य ती पडताळणी झाल्यानंतर तुमच नाव नोंदवल जाईल
काही दिवसांतच तुम्हाला तुमच डिजिटल आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येईल

आयुष्मान कार्डचे फायदे काय?

वर्षाला ₹5 लाख पर्यंत मोफत उपचार
सरकारी व सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार
कॅन्सर, हार्ट सर्जरी, डायलिसिससारख्या मोठ्या उपचारांचा समावेश
संपूर्ण कुटुंबाचा समावेश – फक्त एका कार्डवर
संपूर्ण भारतभर सेवा उपलब्ध

हेही वाचा : 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगारवाढ होणार? जाणून घ्या संभाव्य आकडे.

Share This Article