आयुष्मान कार्डच्या माध्यमातून मोफत उपचार शक्य! पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती येथे वाचा
Ayushman Card Free Treatment Eligibility Application Process : देशभरात राबवली जाणारी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही गरीब व गरजू नागरिकांसाठी एक अत्यंत उपयुक्त आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आयुष्मान कार्ड बनवणे गरजेचे आहे. हे कार्ड कोण बनवू शकत? कस बनवायच? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…
Ayushman Card साठी पात्रता कशी तपासाल?
आयुष्मान कार्ड बनवण्यापूर्वी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण महत्त्वाच आहे. यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाव लागेल.
तिथे ‘AM I Eligible’ या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक, राज्य व इतर माहिती भरल्यावर तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे समजेल.
आयुष्मान कार्ड अर्ज प्रक्रिया
स्टेप 1: सीएससी केंद्राला भेट द्या
तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन तुमची पात्रता तपासा आणि आवश्यक कागदपत्रे द्या. यामध्ये तुमच आधार कार्ड, रहिवासी पुरावा, ओळखपत्र यांचा समावेश असतो.
स्टेप 2: अर्ज व कार्ड बनवणे
तपासणीनंतर पात्र आढळल्यास तुमच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल. आणि काही वेळातच तुमच आयुष्मान कार्ड जनरेट केल जाईल, जे तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड करू शकता.
काय लाभ मिळतो?
एकदा आयुष्मान कार्ड मिळाल्यावर तुम्हाला सरकारकडून दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ मिळतो. ही सुविधा देशभरातील आयुष्मान योजनेत नोंदणीकृत खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. सर्व खर्च सरकारकडून दिला जातो.
आयुष्मान भारत योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी एक वरदान आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर शक्य तितक्या लवकर तुमचं आयुष्मान कार्ड तयार करून घ्या. या योजनेबद्दल तुमच्या माहितीत कोणी गरजू असेल, तर त्यांनाही याबद्दल जरूर सांगा – कारण आरोग्य सर्वांचच महत्त्वाच आहे!
🔴 हेही वाचा 👉 फक्त 2 मिनिटांत मंजूर करा बांधकाम कामगार योजनेचा अर्ज, पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.