Bandhkam Kamgar Yojana Form Activation Online Process Maharashtra : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता अगदी काही मिनिटांत आणि केवळ १ रुपया भरून तुमचा बांधकाम कामगार योजनेचा अर्ज सक्रीय करता येणार आहे. कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सक्रीय असणे अत्यावश्यक असते. परंतु अनेक वेळा नोंदणी पूर्ण झाल्यानंतरही अर्ज “inactive” राहतो आणि त्यामुळे कामगारांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकत नाही. मात्र आता ही प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे.
बांधकाम कामगार योजना अर्ज सक्रीय करण्याची पद्धत?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बांधकाम कामगारांना लॉगिन करावे लागेल. आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून OTPच्या साहाय्याने खाते उघडावे लागेल.
जर अर्जाची स्थिती “Application Status – Accept” आणि “Registration Status – Inactive” अशी असेल, तर अर्ज सक्रीय करण्यासाठी तुम्हाला फक्त ₹1 ऑनलाईन भरावा लागतो. पेमेंटसाठी ‘Payment Details’ पर्यायावर जाऊन विविध डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे रक्कम भरता येते – ज्यात इंटरनेट बँकिंग, QR कोड स्कॅनिंग यांचा समावेश आहे.
यशस्वी पेमेंटनंतर काय करावे?
पेमेंट पूर्ण झाल्यावर पुन्हा लॉगिन करून ‘Application’ आणि ‘Registration Status’ या दोन्ही ठिकाणी हिरव्या रंगात Accept दिसल्यास समजावे की तुमचा अर्ज सक्रीय झाला आहे. नंतर ‘print cash receipt’ व ‘print renewal receipt’ या पर्यायांवर क्लिक करून पावत्या प्रिंट करून घ्या किंवा PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा.
Bandhkam Kamgar Yojana नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
९० दिवस सरकारी ठेकेदाराकडे काम केल्याचे प्रमाणपत्र
ग्रामसेवकाची सही व शिक्का
आधार कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
स्वयंघोषणापत्र
महत्त्वाचे: अर्ज सक्रीय झाल्यानंतरच कामगार कल्याणकारी मंडळाच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येतो. त्यामुळे अर्ज सक्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे मे-जूनचे ₹३००० एकत्र मिळणार? अजित पवारांचे मोठे वक्तव्य.