Bandhkam Kamgar Yojana Registration : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध योजनांचा लाभ दिला जातो. मात्र अनेक वेळा नोंदणी करूनही अर्ज “Inactive” स्थितीत असल्यामुळे बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत फक्त १ रुपया ऑनलाईन भरून अर्ज सक्रिय करता येतो.
Bandhkam Kamgar Yojana अर्ज सक्रिय करण्यासाठी काय करावे?
कामगारांनी अधिकृत संकेतस्थळ mahabocw.in किंवा संबंधित पोर्टलवर लॉगिन करून आपला आधार व मोबाईल नंबर वापरून लॉगिन करावे. त्यानंतर OTP टाकून प्रोफाईलमध्ये लॉगिन केल्यानंतर अर्जाची स्थिती “Application Status: Accept” आणि “Registration Status: Inactive” असल्यास अर्ज सक्रिय करण्यासाठी Payment Details या पर्यायावर क्लिक करावे.
पेमेंट प्रक्रिया कशी करावी?
Payment Details वर क्लिक करून पुन्हा आधार व मोबाईल नंबर टाकून OTP सत्यापित करावा.
यानंतर विविध पेमेंट पर्याय दिसतील – यामध्ये इंटरनेट बँकिंग, UPI किंवा QR कोड यांचा समावेश आहे.
१ रुपया भरल्यानंतर अर्ज सक्रिय होतो.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर अर्जाची स्थिती दोन्ही ठिकाणी हिरव्या रंगात Accept दाखवते.
पावती कशी मिळवावी?
पेमेंट केल्यानंतर Print Cash Receipt आणि Print Renewal Receipt या दोन पर्यायांवर क्लिक करून पावती प्रिंट किंवा PDF स्वरूपात सेव्ह करता येते.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांची सही आवश्यक)
आधार कार्ड
बँक पासबुक
स्वयंघोषणापत्र
पासपोर्ट साइज फोटो
बांधकाम कामगार योजनांचा लाभ कसा घ्याल?
नोंदणी आणि अर्ज सक्रिय केल्यानंतर कामगारांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांसाठी अर्ज करता येतो. त्यामध्ये अपघात विमा, आरोग्य सुविधा, शैक्षणिक मदत, गृहनिर्माण योजनेचा लाभ इत्यादींचा समावेश आहे.
🔴 हेही वाचा 👉 20वा हप्ता मिळणार? स्टेटस तपासण्याची पद्धत जाणून घ्या.