Driving License Update: घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, आता RTOला भेट न देता होणार सगळ काम ऑनलाइन

2 Min Read
Driving License Online Apply Parivahan

Driving License Online Apply Parivahan : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता RTO कार्यालयात रांगेत उभ राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या परिवहन मंत्रालयाने ‘Parivahan Portal’ वरून लर्नर लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, Aadhaar e-KYC पूर्ण केल्यास तुमच लर्नर लायसन्स घरबसल्या मिळू शकत आणि टेस्टही ऑनलाईन देता येते.

Aadhaar eKYC मुळे प्रक्रिया झाली सोपी

लर्नर लायसन्ससाठी अर्ज करताना तुम्ही e-KYC (आधार व्हेरिफिकेशन) पर्याय निवडल्यास, आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज राहत नाही. ऑनलाइन टेस्ट सुद्धा घरबसल्या देता येते. यासाठी फक्त Aadhaar नंबर आणि OTP द्वारे तुमची ओळख पडताळली जाते. सर्व माहिती आपोआप भरली जाते आणि फॉर्म भरायला वेळही कमी लागतो.

Learner Driving License साठी अर्ज कसा करायचा?

  1. सर्वप्रथम parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. ‘Online Services’ मध्ये ‘Driving License Related Services’ या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचे राज्य निवडून ‘Apply for Learner License’ निवडा.
  4. Aadhaar e-KYC पर्याय निवडून आधार नंबर द्या आणि OTP टाका.
  5. तुमची माहिती आपोआप भरली जाईल. अर्ज पूर्ण करा आणि ऑनलाइन टेस्टसाठी स्लॉट बुक करा.

जर तुमच्याकडे आधार e-KYC नसेल, तर तुम्हाला RTO ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागेल.

डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग

सरकारची ही नवी सुविधा डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग असून नागरिकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गैरसोय टाळण्यासाठी मोठ पाऊल ठरत आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यापासून ते लर्नर लायसन्स डाउनलोड करण्यापर्यंत सगळी प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्डधारकांनो सावधान! ही चूक केली तर बंद होऊ शकत तुमच रेशन कार्ड.

Share This Article