Government Scheme: दररोज 10,000 रुपये कमावण्याची संधी देणारी सरकारी योजना! जाणून घ्या काय आहे ही योजना?

2 Min Read
Fact Check Daily 10000 Income Government Scheme Fake Alert

Fact Check Daily 10000 Income Government Scheme Fake Alert : डिजिटल युगात जिथे सगळे व्यवहार ऑनलाइन होत आहेत, तिथेच फसवणुकीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर एक दावा जोरात व्हायरल होत आहे कि सरकारने एक अशी योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे नागरिक दररोज 10,000 रुपये कमवू शकतात. एवढच नाही, तर या योजनेअंतर्गत काहींनी 80,000 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत कमावले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पण या दाव्याच्या मुळाशी गेल्यावर खरी गोष्ट समोर येते – हा दावा पूर्णपणे फसवा आणि खोटा आहे.

काय आहे व्हायरल दावा?

‘india09.com’ नावाच्या वेबसाइटवर दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे, ज्यात नागरिकांना दररोज ₹10,000 कमावता येतील. अनेकांनी आधीच लाखोंची कमाई केली असून तुम्हीही ही संधी गमावू नका, असा संदेश दिला जात आहे.

यामागे सत्य काय आहे?

PIB Fact Check या सरकारी खात्याने स्वतः ट्विट करून स्पष्ट केले आहे की, सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. या प्रकारच्या बनावट वेबसाइट्सवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती देणे अतिशय धोकादायक ठरू शकते.

🔗 PIB Fact Check Tweet :

कशामुळे आहे धोका?

अशा बनावट वेबसाइट्स सामान्य नागरिकांकडून त्यांचे बँक डिटेल्स, आधार क्रमांक, OTP आणि इतर संवेदनशील माहिती गोळा करतात. एकदा का ही माहिती मिळाली, की सायबर गुन्हेगार तुमच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेऊ शकतात, किंवा तुमच्या नावाने कर्जही घेऊ शकतात.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

कुठलीही योजना खरी आहे की नाही हे तपासण्यासाठी PIB Fact Check किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाइट्सचा वापर करा.
अनोळखी लिंक, WhatsApp फॉरवर्ड किंवा अज्ञात वेबसाइट्सवर विश्वास ठेवू नका.
कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्यापूर्वी त्याची दोनदा खात्री करा.

🔴 हेही वाचा 👉 तुमच Pan Card बंद तर नाही ना? मोबाइलवरून घरबसल्या अस करा Status Check, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया.

Share This Article