Farmer Loan Maharashtra 2025 : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. आता सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेतून शेतकऱ्यांना फक्त ४ टक्के व्याजदरात 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. केंद्र सरकारच्या MISS स्कीमअंतर्गत शेतकऱ्यांसाठी कर्जमर्यादा ३ लाखांवरून थेट ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देशभरातील करोडो शेतकऱ्यांना मिळणार आहे.
किसान क्रेडिट योजनेतून शेतकऱ्यांना अल्प मुदती कर्ज दिल जात, जे सामान्यतः ७% व्याजदराने दिल जात. मात्र, सरकार १.५% व्याजावर सबसिडी देते आणि वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी ३% व्याज सवलत मिळते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी एकूण व्याजदर फक्त ४% राहतो.
Kisan Credit Card Loan 2025 साठी कोण पात्र आहेत?
Kisan Credit Card Loan योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रकारचे शेतकरी पात्र ठरतात:
पारंपरिक शेती करणारे शेतकरी
पशुपालन करणारे
मच्छीमारी करणारे (परवान्यासह)
पोल्ट्री पालन करणारे
भाडेपट्टीवर शेती करणारे
डेअरी व्यवसाय करणारे
कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड (ओळख व पत्त्याचा पुरावा)
बँकेच्या शाखेतील किंवा पीएम किसान पोर्टलवरील फॉर्म
जमीन किंवा व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे
Kisan Credit Card Loan साठी अर्ज कसा करायचा?
- PM Kisan ची अधिकृत वेबसाईट उघडा
- तिथे “किसान क्रेडिट कार्ड” पर्याय निवडा आणि फॉर्म डाउनलोड करा
- फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँकेत सादर करा
- माहिती पडताळल्यानंतर लवकरच तुमच कर्ज मंजूर केल जाईल
हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! पगाराच्या ५०% इतकी पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता हा निश्चित लाभ.