Free Tablet Yojana Maharashtra 2025 Fact Check : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही वेबसाइट्सवर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीनुसार, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योती (महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) तर्फे मोफत टॅबलेट, १८ महिन्यांच NEET, JEE व CET प्रशिक्षण आणि दररोज 6 GB इंटरनेट डेटा देणारी योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेच वर्णन वाचून कुणालाही वाटेल की ही एक चांगली संधी आहे, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी. परंतु, यामागच सत्य थोड वेगळच आहे – आणि ते समजून घेण अत्यंत महत्त्वाच आहे.
Free Tablet Yojana Maharashtra या योजनेचा नेमका स्त्रोत काय आहे?
महाज्योती ही संस्था मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी शैक्षणिक योजना राबवते हे निश्चित आह. परंतु 2025 मध्ये “मोफत टॅबलेट योजना” सुरू असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा अथवा जाहिरात महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.
फॅक्ट चेक दरम्यान mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळाची तपासणी केली असता, अशा कोणत्याही योजनेची अधिसूचना किंवा फॉर्म उपलब्ध नाही. महाज्योतीच्या अधिकृत प्रतिनिधींनीही स्पष्ट केल आहे की, सध्या अशा स्वरूपाची कोणतीही योजना सुरु नाही आणि सोशल मीडियावर फिरणारी माहिती खोटी आहे.
व्हायरल मेसेजचा उद्देश काय असू शकतो?
या प्रकारचे बनावट मेसेज प्रामुख्याने विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती (आधार, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला इ.) मिळवण्यासाठी पसरवले जातात. यामध्ये नकली वेबसाइट्सच्या लिंकवर अर्ज भरायला लावून डेटाचोरी किंवा भविष्यात फसवणूक होण्याचा धोका असतो.
विद्यार्थ्यांनी काय कराव?
कोणतीही योजना खरी आहे की नाही, हे तपासण्यासाठी नेहमी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी खात्री करा
आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, बँक तपशील यासारखी वैयक्तिक माहिती अनोळखी पोर्टलवर शेअर करू नका
शंका असल्यास थेट महाज्योतीच्या अधिकृत क्रमांकावर किंवा ईमेलवर संपर्क साधा
निष्कर्ष:
महाज्योती कडून 2025 मध्ये मोफत टॅबलेट, प्रशिक्षण आणि डेटा योजना जाहीर करण्यात आल्याचा दावा पूर्णतः खोटा आहे. विद्यार्थ्यांनी अशा अफवांपासून सावध राहाव.
हेही वाचा : तुम्ही ‘आयुष्मान कार्ड’साठी पात्र आहात का? पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.