Gatai Kamgar Yojana 2025 Application Started : महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी अत्यंत महत्वाची असलेली गटई कामगार योजना 2025 आता पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार असून, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. समाज कल्याण विभागाने पात्र अर्जदारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
गटई कामगार योजनेचा उद्देश गटई व्यवसाय करणाऱ्या कामगारांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण देणे, तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना देणे हा आहे. स्टॉलसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्रातील चर्मकार समाजाचा सदस्य असणे आवश्यक आहे.
Gatai Kamgar Yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे:
गटई कामगार योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा व त्याच्याकडे संबंधित व्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न ₹98,000 पर्यंत व शहरी भागातील अर्जदारांचे उत्पन्न ₹1,20,000 पर्यंत असावे.
अर्ज करताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे:
जातीचा दाखला (SC – चर्मकार)
रहिवासी प्रमाणपत्र
व्यवसायाचा पुरावा किंवा छायाचित्र
भाडे करारनामा (स्टॉलच्या जागेसाठी)
शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
रेशन कार्डची प्रत
गटई कामगार योजनेसाठी कुठे व कसा अर्ज करायचा?
ही अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑफलाइन असून, अर्जाचा नमुना संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. इच्छुकांनी तो भरून, आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावा.
या योजनेद्वारे रस्त्याच्या कडेला व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक चर्मकार समाजातील अनेकांना स्वावलंबनाची संधी मिळणार आहे. लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा!
हेही वाचा : आता 18 वर्षांखालील मुलांसाठीही पॅन कार्ड आवश्यक? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.