मुंबई | ३ जून २०२५ : Gharakul Yojana Beneficiaries Free Sand Distribution Maharashtra Govt Scheme 2025 – राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक शहरी व ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घरबांधणीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या ही योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्यक्षात राबवली जात असून, तिचा लवकरच इतर जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचे संकेत आहेत. कोल्हापूरमध्ये सुमारे ४१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.
राज्यात याआधी अनेक ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार, व ३० एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार, अशा प्रकरणांमध्ये वाळूपुरवठ्याची अंमलबजावणी अधिक सुलभ केली जाणार आहे.
लाभार्थ्यांना काय मिळणार?
घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही योजना पुढे नेण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत आहेत.
सामंजस्याने नियोजन
या योजनेची अंमलबजावणी गौणखनिज विभाग, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने केली जात आहे. पाणलोट क्षेत्रात साचलेल्या गाळाचा उपसा करताना पर्यावरणाच्या अटींची काटेकोरपणे पूर्तता केली जाणार आहे.
राज्यभर राबवणार योजना?
ही योजना सध्या कोल्हापूर जिल्ह्यापुरती लागू असली तरी, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारची अंमलबजावणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाने जिथे पर्यावरण मंजुरी आवश्यक नाही, अशा प्रकरणांची तत्काळ निश्चिती करून जलद कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार.