Goat Cow Buffalo Poultry Subsidy Scheme Maharashtra 2025 : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत बेरोजगार व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी नाविन्यपूर्ण योजना 2025 अंतर्गत विविध अनुदानित योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुधाळ गाय, म्हैस, शेळी गट वाटप तसेच मांसल कुक्कुटपालन योजनेचा समावेश आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया, पात्रता, अनुदानाची रक्कम व आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली सविस्तर दिली आहे.
दुधाळ गाय व म्हैस वाटप योजनेची वैशिष्ट्ये
दोन संकरीत गायींसाठी ₹1,40,000 अनुदान (प्रकल्प किंमत ₹1,56,850 जीएसटीसह)
दोन म्हशींसाठी ₹1,60,000 अनुदान (प्रकल्प किंमत ₹1,79,258)
अनुसूचित जाती/जमातींसाठी 75% अनुदान; सामान्य प्रवर्गासाठी 50% अनुदान
शेळी गट वाटप योजनेचे तपशील
10 शेळ्या व 1 बोकड – ₹90,000 पर्यंत अनुदान (जातीप्रमाणे रक्कम वेगळी)
स्थानिक शेळ्यांसाठी थोडे कमी अनुदान
75% अनुदान SC/ST प्रवर्गासाठी, इतरांसाठी 50%
कुक्कुटपालनासाठी देखील अनुदान
1,000 चौरस फूट शेड व भांडे खरेदीसाठी ₹2.25 लाखांचे अनुदान
निवास, स्टोअर, पाण्याची सोय, ब्रूडर इत्यादी सामुग्रीसाठी वापरता येईल
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाईट: https://ah.mahabms.com
मोबाईल अॅपद्वारे देखील अर्ज शक्य
अर्ज करताना 80KB फोटो व 40KB स्वाक्षरी अपलोड आवश्यक
निवडीनंतरच मूळ कागदपत्रांची मागणी केली जाईल
पात्रता व अटी
1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन असणारे अल्पभूधारक
सुशिक्षित बेरोजगार युवक व महिला बचत गट
महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रांतील अर्जदार अपात्र
एका आधार क्रमांकावर एकच अर्ज करता येईल
अर्जाची वैधता 5 वर्षे राहील
या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवकांना शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होणार असून, स्वावलंबनाची दिशा मिळेल. आपण पात्र असाल, तर निश्चितपणे मुदतीपूर्वी अर्ज दाखल करा.
हेही वाचा : फक्त ५ वर्षात मिळवा ₹४.९३ लाखांचा नफा; पोस्ट ऑफिसच्या NSC योजनेत सुरक्षित गुंतवणुकीसह करसवलतीचा दुहेरी फायदा.