Jan Dhan Yojana Eligibility Process 2025 : भारत सरकारने 2014 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही एक वित्तीय समावेशन योजनेचा भाग आहे. या योजनेंतर्गत देशातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बँकिंग प्रणालीपासून दूर असलेल्या नागरिकांसाठी शून्य शिल्लक खाते उघडण्याची सुविधा दिली जाते. अनेक लाभांसह ही योजना आजही बऱ्याच नागरिकांना आकर्षित करते. मात्र, काही गैरसमज आणि अर्धवट माहितीमुळे लोकांमध्ये शंका निर्माण होत आहे की “सर्वांना हे खाते उघडता येते का?”
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सेवेचा लाभ देणे हा आहे. त्यामुळे काही विशिष्ट अटी आणि पात्रतेच्या निकषांनुसार खाते उघडता येते.
कोण पात्र आहेत?
ज्याचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त आहे (10-18 वयोगटातील मुलांसाठी खाते पालकांच्या संमतीने उघडले जाते).
ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे, जसे की गरीब, बेरोजगार, शेतकरी, कामगार वर्ग इ.
बँकिंग सेवेपासून दूर असलेले नागरिक.
योजनेअंतर्गत 18 ते 59 वयोगटातील खातेदारांना अपघात विमा (1 लाख रुपये) आणि मृत्यूनंतर 30,000 रुपये जीवन विमा मिळतो.
खातेधारकाकडे आधार कार्ड आणि पत्ता पुरावा असावा लागतो.
कोण अपात्र आहे?
केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी.
सरकारी सेवा निवृत्त कर्मचारी.
आयकरदाते (Taxpayers).
आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिक, विशेषत: ज्यांच्याकडे आधीपासून बँकेमध्ये खाते, विमा, गुंतवणूक साधने आहेत.
खाते उघडण्याची प्रक्रिया
- नजिकच्या बँकेत जा – तुमच्या जवळच्या कोणत्याही सार्वजनिक बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
- फॉर्म भरा – ‘जन धन’ खात्याचा फॉर्म घेऊन त्यामध्ये तुमची माहिती भरा.
- दस्तावेज सादर करा – आधार कार्ड, पत्ता पुरावा (जसे की रेशन कार्ड, विज बिल), फोटो यांची प्रत जोडावी आणि मूळ प्रत सोबत घेऊन जावी.
- प्रक्रिया पूर्ण – माहिती आणि दस्तावेज योग्य आढळल्यास शून्य शिल्लक जन धन खाते उघडले जाईल.
जन धन योजनेचे फायदे
खाते उघडण्यासाठी कोणतीही किमान रक्कम आवश्यक नाही.
मोफत रूपे डेबिट कार्ड मिळते.
सरकारी योजना, अनुदाने थेट खात्यात जमा होते.
मायक्रो क्रेडिट सुविधा – वेळोवेळी योग्य व्यवहार करणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंतचे ओव्हरड्राफ्ट.
विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेचा आधार.
‘प्रत्येकजण जन धन खाते उघडू शकतो’ हे अपूर्ण सत्य आहे. ही योजना केवळ गरजू आणि बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न नागरिक, सरकारी कर्मचारी आणि करदाते यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. खाते उघडताना सर्व निकष तपासणे आणि योग्य दस्तावेज सादर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : मिळणार मोफत लॅपटॉप – लिस्ट मध्ये तुमच नाव चेक करा.