Interest Subsidy Scheme : ७.७१ कोटी शेतकऱ्यांना दिलासा; व्याज सवलत योजनेला मुदतवाढ

2 Min Read
KCC Loan Interest Subsidy Extension 2025-26 Farmer Benefit

KCC Loan Interest Subsidy Extension 2025-26 Farmer Benefit : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याज सवलत योजनेला २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील ७.७१ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

या योजनेसाठी केंद्र सरकारने १५,६४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. व्याज सवलत योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीची मंजुरी मिळाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेती, पशुपालन व मत्स्यपालनासाठी सुलभ कर्ज

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केसीसीच्या माध्यमातून ७ टक्के वार्षिक व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. तसेच, जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर परतफेड केल्यास ३ टक्के व्याज सवलत मिळते, म्हणजेच प्रत्यक्षात शेतकरी केवळ ४ टक्के व्याज भरतात. पशुपालन व मत्स्यपालनासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही २ लाख रुपयांपर्यंत ही व्याज सवलत लागू होते.

कृषी कर्जामध्ये मोठी वाढ

गेल्या दशकात केसीसी अंतर्गत दिल्या गेलेल्या कर्जाच्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

२०१४ मध्ये केसीसीमार्फत ₹४.२६ लाख कोटींचे कर्ज वितरित झाले होते.
२०२४ मध्ये हा आकडा वाढून ₹१०.०५ लाख कोटींवर गेला आहे.
तसेच, एकूण कृषी कर्जदेखील २०१३-१४ मध्ये ₹७.३ लाख कोटींवरून २०२३-२४ मध्ये ₹२५.४९ लाख कोटींवर पोहोचले आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

व्याज सवलत योजनेच्या मुदतवाढीचा अर्थ असा की, पुढील वर्षभरातही शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज घेण्याची सुविधा मिळणार आहे. देशातील ग्रामीण भागात शेतीचा खर्च सतत वाढत चालला असताना, अशा प्रकारची सवलत शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा : धक्कादायक! ‘इतक्या’ सरकारी महिला कर्मचारी निघाल्या “लाडक्या बहिणी”; सरकार करणार ३.५९ कोटींची वसुली.

Share This Article