Kukut Palan Yojana Maharashtra : कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २५ माद्या व ३ नर कोंबड्यांचे वाटप होणार

2 Min Read
Kukut Palan Yojana 2025 Application Started

Kukut Palan Yojana 2025 Application Started : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि बेरोजगार तरुण-तरुणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कुक्कुटपालन योजनेअंतर्गत कोंबड्यांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेसाठी २ मे २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक लाभार्थी १ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

कुक्कुटपालन योजनेअंतर्गत तलंगा जातीच्या २५ माद्या आणि ३ नर कोंबड्यांचे वाटप केले जाणार आहे. एकूण प्रकल्पाची किंमत ५,४२० रुपये असून, यामध्ये शासनाकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येईल. उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वहिस्सा स्वरूपात भरायची आहे.

पात्र लाभार्थ्यांमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, स्वयंरोजगारासाठी नोंदणी केलेले बेरोजगार युवक, महिला बचत गटातील सदस्य यांचा समावेश होतो. लाभार्थ्यांची निवड करताना ३० टक्के आरक्षण महिलांसाठी ठेवण्यात आले आहे.

कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करताना आधारकार्ड, सातबारा, ८ अ उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते तपशील, रेशनकार्ड, अपत्य दाखला, जात प्रमाणपत्र (असल्यास), आणि शैक्षणिक पात्रता ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जाच्या प्रक्रियेसाठी https://ah.mahabms.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करता येईल.

अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, अथवा कॉल सेंटर (1962) वर संपर्क साधू शकता. तांत्रिक अडचणींसाठी 8308584478 या क्रमांकावर सहाय्य मिळू शकते.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायास चालना मिळणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 Setu Services : शासकीय दाखले काढताना आता किती पैसे लागणार? जाणून घ्या नवे दर.

Share This Article