कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी – लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करा! Kukut Palan Yojana Maharashtra 2025

2 Min Read
Kukut Palan Yojana Maharashtra 2025 Last Date Apply Now

Kukut Palan Yojana Maharashtra 2025 Last Date Apply Now : पशुसंवर्धन विभागाच्या कुक्कुटपालन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 जून 2025 आहे. योजनेअंतर्गत ८ ते १० आठवड्यांचे तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर कोंबड्यांचे वाटप केले जाणार असून, अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS मोबाईल अॅप द्वारे अर्ज करावा.

कुक्कुटपालन योजना दारिद्र्यरेषेखालील शेतकरी, अल्पभूधारक, महिला बचत गट सदस्य, सुशिक्षित बेरोजगार इत्यादींसाठी उपयुक्त असून, ३०% महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शासकीय अनुदानाचे प्रमाण सर्व प्रवर्गासाठी ५०% इतके आहे.

अर्जाची अंतिम तारीख: १ जून २०२५

अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, ७/१२ उतारा, ओळखपत्र, अपत्य दाखला/स्वयंघोषणा, बँक पासबुक, रेशन कार्ड/कुटुंब प्रमाणपत्र, कर्जाचे संमतीपत्र (जर जमीन स्वतःची नसेल तर), जातीचा दाखला (असल्यास), शिक्षण, अपंग, बचत गट प्रमाणपत्र वगैरे.

Kukut Palan Yojana अर्ज कसा कराल?

  1. https://ah.mahabms.com वर जा किंवा AH-MAHABMS App गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा.
  2. ‘अर्जदार नोंदणी’ या टॅबवर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क:

पशुधन विकास अधिकारी / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय
कॉल सेंटर: 1962 (सकाळी 7 ते सायं. 6)
तांत्रिक सहाय्य: 8308584478 (सकाळी 10 ते सायं. 6)

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे – पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करायला उशीर करू नये. ही योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा – अदिती तटकरे यांची नागरिकांना सूचना.

Share This Article