Ladki Bahin Yojana 11th Installment : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली असून मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत बँक खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ ते ३ मे दरम्यान जमा झाला होता, त्यामुळे यावेळीही महिना अखेरपर्यंत पैसे मिळतील अशी आशा आहे.
मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार जर मे अखेरपर्यंत हप्ता जमा झाला नाही, तर मे आणि जून महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये जमा केलेला जाऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याआधी १० हप्ते मिळाले असून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले जात आहेत. राज्य सरकारकडून ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे.
राज्य शासनाने वेळेत हप्ते वितरित करावेत, अशी मागणी लाभार्थी महिलांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे अकराव्या हप्त्याची प्रतिक्षा आता केवळ काही दिवसांची राहिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 पशुसंवर्धन विभागात ३११ पदांसाठी भरती; MPSC ने प्रसिद्ध केली जाहिरात ‘ही’ आहे अर्जाची अंतिम तारीख.