Ladki Bahin Yojana 2025: सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांची नावे यादीतून वगळली जाणार?

2 Min Read
Ladki Bahin Yojana 2025 Beneficiary Verification ITR Action

मुंबई | ५ जून २०२५: Majhi Ladki Bahin Yojana 2025 Beneficiary Verification ITR Action – राज्यातील गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्याने सरकारने आयकर खात्याच्या मदतीने लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये अनेक सरकारी नोकरदार महिलांनी देखील लाभ घेतल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

अपात्र महिलांची नावे वगळली जाणार

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की अपात्र महिलांकडून पूर्वी दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही. मात्र, त्यांची नावे लाडकी बहीण योजनेच्या यादीतून वगळली जाणार आहेत. महिला व बालविकास विभागाला केंद्र सरकारकडून ITR (Income Tax Return) तपासण्याची अधिकृत परवानगी मिळाल्याने, अपात्र लाभार्थ्यांचा शोध अधिक अचूकपणे घेतला जाणार आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची नवीन आकडेवारी

डिसेंबर २०२४ पर्यंत २.४६ कोटी महिलांना लाभ मिळत होता, परंतु फसवणुकीमुळे ही संख्या आता २.३७ कोटींवर आली आहे. आतापर्यंत ९ लाख महिलांची नावे आधीच यादीतून वगळण्यात आली आहेत आणखी ४० लाख महिलांची नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता ITR डाटावर आधारित पात्रता ठरेल

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ३ जून २०२५ रोजी अधिसूचना जारी करून महाराष्ट्र सरकारला लाभार्थ्यांच्या आयकर विवरणपत्र तपासण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही हे सुनिश्चित होणार आहे.

हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची योजना! मिळवा १० लाखांपर्यंत शिक्षण कर्ज, कोणत्याही हमीशिवाय आणि व्याज सवलतीचा लाभ.

Share This Article