Ladki Bahin Yojana Beneficiary Verification 2025 : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) आता नव्या वळणावर आली असून, शासनाने लाभार्थी महिलांची उत्पन्न तपासणी पुन्हा सुरू केली आहे. आयकर विभागाकडून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
२ लाख अर्जांची पडताळणी, हजारो महिला अपात्र
राज्य शासनाने आतापर्यंत २ लाखांहून अधिक अर्जांची छाननी केली आहे. यातून २,२८२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास मंत्रीअदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी ही पडताळणी गरजेची असून, यामध्ये अपात्र लाभार्थ्यांना वगळले जाईल.”
आयकर विभाग देणार उत्पन्नाचा डेटा
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आयकर विभागाकडून महिलांचे उत्पन्न तपशील मागवले आहेत. याच्या आधारे सरकार योग्य लाभार्थ्यांची यादी अद्ययावत करणार आहे. आयकर खात्याकडून मिळणाऱ्या माहितीमुळे बोगस लाभार्थ्यांची नावे समोर येणार असून, योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
कोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवले?
2.30 लाख महिला – संजय गांधी निराधार योजना लाभार्थी
1.10 लाख महिला – ६५ वर्षांवरील वयोमर्यादा
1.60 लाख महिला – चारचाकी वाहनधारक
7.70 लाख महिला – नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी
2,652 महिला – शासकीय सेवेत कार्यरत
लाडकी बहिण योजना – एक नजर
जुलै २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ही योजना जाहीर केली होती. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹१५०० थेट खात्यावर पाठवण्याची तरतूद करण्यात आली होती. या योजनेसाठी आतापर्यंत २.६५ कोटी महिलांनी नोंदणी केली असून, २.५ कोटी महिलांना निधीचा लाभ मिळतोय. मात्र पडताळणीनंतर अंदाजे १.२० कोटी महिला पात्र ठरण्याची शक्यता आहे.
पुढील टप्प्यात काय होणार?
राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जात असून, लवकरच बोगस लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. आयकर डेटा मिळाल्यानंतर ही कारवाई अधिक वेगाने केली जाईल. यामुळे खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
हेही वाचा : दर महिन्याला फक्त 5,000 रुपये गुंतवून मिळवा ₹8,54,272.