Ladki Bahin Yojana Loan : लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा! व्यवसायासाठी ४० हजारांचे कर्ज

2 Min Read
Ladki Bahin Yojana Loan Scheme

Ladki Bahin Yojana Loan Scheme : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. आता या योजनेतील पात्र महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी बँकांमार्फत ४० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाचा हप्ता देखील सरकारकडूनच भरला जाण्याची शक्यता असून हा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

सध्या राज्यातील करोडो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारचा अंदाजे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. आता त्यात आणखी एक मोठा निर्णय घेत सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्या बहिणींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करायचा आहे, पण भांडवलाची अडचण आहे, अशा महिलांसाठी कर्जाची सोय केली जात आहे. काही सहकारी बँका या योजनेसाठी पुढे आल्या आहेत. लवकरच बँकांशी अंतिम चर्चा करून योजना लागू केली जाईल. कर्जाचा हप्ता योजनेतूनच वळवण्यात येईल.”

त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही उत्तर देताना सांगितले की, “कधी कधी निधी थोडासा उशीराने मिळतो, त्यामुळे अफवा पसरवल्या जातात. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट अधिक बळकट करण्यात येणार आहे.”

यासोबतच अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीजबिलांबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली. “शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सोलार पॅनेल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शासन वीजबिल भरते, त्यासाठी दरमहिन्याला २० हजार कोटी रुपये खर्च येतो,” असेही ते म्हणाले.

🔴 हेही वाचा 👉 राज्यातील सर्व पालिकांमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार; नागरिकांना मिळणार विविध विभागांच्या ऑनलाइन सेवा.

Share This Article