Ladki Bahin Yojana May Installment: लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये? नवीन अपडेट जाणून घ्या

2 Min Read
Ladki Bahin Yojana May Installment Delay Update

Ladki Bahin Yojana May Installment Delay Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र मे महिन्याचा हप्ता अद्याप बँकेत जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. आता या हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

साम टीव्हीच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीलाच जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. जर तसे झाले, तर मे व जून दोन्ही महिन्यांचे एकत्र ₹3000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतात.

हप्ता मे महिन्यात मिळणार की जूनमध्ये?

मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे महिलांमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. एकीकडे काही महिला वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे महिलांना जूनमध्ये दोन हप्ते मिळतील अशी चर्चा आहे.

आतापर्यंत एकूण 10 हप्ते जमा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर थेट DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून पैसे जमा होतात. आतापर्यंत 10 हप्ते लाभार्थींना मिळाले असून, मे महिन्याचा हप्ता 11वा ठरणार आहे. शासनाच्या अधिकृत घोषणेसाठी महिलांनी अधिकृत पोर्टल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे गरजेच आहे.

महिलांनी काय कराव?

जर आपल्या खात्यावर हप्ता जमा झाला नसेल, तर आपल स्टेटस तपासा. तसेच, आपल्या बँक खात्याची स्थिती, आधार लिंकिंग आणि मोबाईल नंबर अपडेट आहे का हे देखील तपासण गरजेच आहे.

🔴 हेही वाचा 👉 महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? जाणून घ्या सविस्तर.

Share This Article